जिल्ह्यात १०८ रुग्णवाहिकेचा बोजवारा…!

0
400
सिंधुदुर्गनगरी : दि. ०८ : सिंधुदुर्गात १०८ रुग्णवाहिका सेवेचा खेळ खंडोबा झाला आहे. जिल्ह्यातील ग्रामीण रुग्णालयामधील रुग्णांना या रुग्णवाहिकेचा मोठा आधार असतो. मात्र, या सेवेचा पुरता बोजवारा उडालेला आहे. याचा त्रास सामान्य रुग्णांना सहन करावा लागत आहे. या सेवेसाठी फोन केल्यास बऱ्याचवेळा व्यस्त असल्याचे सांगण्यात येते. एकूण १२ रुग्णवाहिका असून त्यातील दोडामार्ग आणि वैभवावाडी या ठिकाणच्या दोन रुग्णवाहिका सुरु आहेत. अनेक रुग्णवाहिकांमध्ये डॉक्टर उपलब्ध नाहीत. पर्यवेक्षक या जागेवर १० वी पास असलेली व्यक्ती कार्यरत आहे. असिस्टंट डीस्ट्रीक्ट मॅॅनेजर हे सांगलीचे असून, त्यांच्याकडे चिपळूण, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्याचा पदभार आहे. वरिष्ठ पदावर असलेल्या या व्यक्ती जिल्ह्यात फिरकतही नाही, असा आरोप होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here