दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर आ. वैभव नाईक यांच्या प्रचाराला घरोघरी सुरवात

0
625

कुडाळ, दि. ०८ :  कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना भाजप रिपाई रासप महायुतीचे उमेदवार आ. वैभव विजय नाईक यांच्या प्रचाराला कार्यकर्त्यांनी जोर धरला असून आज दसरा सणाच्या मुहूर्तावर कुडाळ मालवण तालुक्यातील महायुतीचे कार्यकर्ते घरोघरी जाऊन प्रचार करत आहेत. यावेळी आमदार वैभव नाईक यांचा पुढील पाच वर्षातील संकल्पनामा प्रत्येक घराघरात वाटप केला जात आहे. या संकल्पनाम्यात आमदार वैभव नाईक यांनी कुडाळ मालवणच्या सर्वांगीण विकासाचे व्हिजन मांडले आहे.आमदार वैभव नाईक यांना मोठ्या मताधिक्याने निवडून आणण्याचा निर्धार कार्यकर्त्यांनी केला आहे. यामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. गेल्या पाच वर्षात अनेक विकास कामे आमदार वैभव नाईक यांनी मार्गी लावली. कुडाळ मालवणचा सर्वांगीण विकास व्हावा यादृष्टीने रस्ते पाणी वीज या प्रमुख कामांना त्यांनी प्राधान्य दिले. मतदारसंघात उद्योग व्यवसाय, रोजगाराच्या संधी, पर्यटनात वाढ होण्यासाठी पायभूत सुविधा दर्जदार असणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने आमदार वैभव नाईक यांनी गेल्या पाच वर्षात उल्लेखनीय काम केले आहे. येथील शेतकरी सधन झाला पाहिजे, महिलांच्या हाती रोजगार मिळाला पाहिजे. मच्छिमार बांधवाना अच्छे दिन आले पाहिजेत , नवनविन प्रकल्प जिल्ह्यात आले पाहिजेत. शासनाच्या सर्व योजनांचा लाभ गरीब गरजू लोकांना झाला पाहिजे.येथील विध्यार्थ्यांना दर्जेदार शैक्षणिक सुविधा उपलब्ध झाल्या पाहिजेत, येथील पारंपरिक कलेचा सन्मान झाला पाहिजे पुढील पाच वर्षातील हेच व्हिजन आमदार वैभव नाईक यांचे असून त्याबाबतची सविस्तर माहिती त्यांनी आपल्या संकल्पनाम्यात मांडली आहे.कार्यकर्त्यांनी आजपासून घरोघरी भेट देऊन प्रचारात आघाडी घेतली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here