सर्पमित्र देवेंद्र पाताडे याने दिले धामण सापास जीवदान

0
365

सिंधुदुर्ग : सुकळवाड पाताडेवाडी येथे बागायती कुंपणास लावलेल्या जाळ्यात अडकलेल्या धामण जातीच्या सापास सर्पमित्र देवेंद्र उर्फ बाप्पा पाताडे याने सोडवून जीवदान दिले.कुंपणास लावलेल्या बारीक धाग्याच्या जाळ्यात सदर साप फसला होता.सापाच्या तोंडात सदर जाळे पूर्णपणे फसल्याने त्याला बाहेर येणे शक्य नव्हते.अंदाजे तीन दिवस तरी सदर साप तिथे अडकून होता. सर्पमित्र देवेंद्र उर्फ बाप्पा पाताडे यांच्या लक्षात येताच त्यांनी त्या ठिकाणी धाव घेत धामण जातीच्या सापास जाळ्यातून सोडवत जीवदान देऊन नैसर्गिक अधिवासात सोडले.सर्पमित्र देवेंद्र उर्फ बाप्पा पाताडे यांनी यापूर्वी विरार परिसरात घरात घुसलेल्या अनेक जातीच्या सापांना पकडून जीवदान देण्याचे काम केले आहे.सद्या ते म्हापसा गोवा येथे एनिमल फार्मला कार्यरत आहेत. साप सोडविणे कामी त्यांना नितीन पाताडे यांनीही सहकार्य केले.सर्पमित्र देवेंद्र पाताडे यांच्या या कामाचे परिसरात कौतुक होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here