मी राणेंना घाबरलो नाही, राजन तेली काय चीज ? : दिपक केसरकर

0
2485

सिंधुदुर्ग : दि ९ : जिल्ह्यातील तिन्ही उमेदवार राणेसमर्थक आहेत. जिथे मी राणेंना घाबरलो नाही, तिथे राजन तेली काय चिज ? मी कोणावर टीका करत नाही पण माझ्यावर केलेली टीका सहन करणार नाही असा इशारा देत टीका करण्यापेक्षा केलेली विकास कामे लोकांपर्यंत पोचवा जनता आपल्या बरोबर आहे. भाजपचे निष्ठावंत कार्यकर्ते आपल्यासोबत आहेत त्यामुळे माझा विजय निश्चित आहे. कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवून विचलित होऊ नका आपण केलेली विकास कामे जिल्ह्यातली जनतेला सांगा असे आवाहन सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार दीपक केसरकर यांनी वेंगुर्ले तालुक्यातील आडेली येथे प्रचार सभेत बोलताना केले. सिंधुदुर्ग जिल्हा सुसंस्कृत जिल्हा घडविण्यासाठी शिवबंधन आवश्यक आहे. घरोघरी शिवसेना पोहोचली पाहिजे. आपण केलेली विकास कामे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पर्यंत पोहोचली पाहिजेत. २७०० कोटीचा निधी आणला हे लोकांना सांगा, जनतेला विकास कामाची माहिती द्या असे आवाहन दीपक केसरकर यांनी या प्रचार सभेत बोलताना केले, आडेली गावातील ग्रामस्थांनी या प्रचार सभेला मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here