अधी कमळ निशाणी आणा ; मगच भाजप नेत्यांचे फोटो लावा : दीपक केसरकर

0
1568

वेंगुर्ला : दि ९ : विकासकामांची माहिती वाडीवाडीवर पोहोचवा. केलेल्या विकासकामांमुळे आपला विजय निश्चित आहे. जिल्ह्यातील निष्ठावंत भाजप कार्यकर्ते आमच्यासोबत आहे. तेलींना पहिल्यांदा कमळ निशाणी आणायला सांगा मगच मुख्यमंत्री,पंतप्रधान आणि भाजप नेत्यांचे फोटो लावा असा टोला पालकमंत्री दीपक केसरकर यांनी आडेली येथील प्रचार सभेच्या शुभारंभी राजन तेली यांना लगावला. नारायण राणे यांचे समर्थकच या तिन्ही मतदार संघात उभे आहेत.मी कोणावरही टीका करणार नाही पण माझ्यावर टीका करणाऱ्यांचा समाचार घेतल्याशिवाय राहणार नाही.पूर्वीच्या पालकमंत्र्यांनी आणलेला विकास निधी पहा आणि मी आणलेलं २७५० कोटींचा विकास निधी पहा,म्हणजे तुम्हाला समजेल की कार्यक्षम कोण पालकमंत्री कोण आहेत. आमचा मित्रपक्ष भाजप आहे,स्वाभिमान नाही.जर राणेंना आपल्या मुलाला निवडून आणायची एवढीच हमी होती तर त्यांना भाजपचा आधार घ्यावासा का वाटला? का त्यांनी स्वाभिमान पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढवली नाही असा सवाल करत केवळ सत्तेसाठी ते भाजपमध्ये आलेत.मात्र ज्या जनतेने त्यांना मागच्या निवडणुकीत धडा शिकवला तीच जनता यावेळीही पुनरावृत्ती करेल असा विश्वासही केसरकर यांनी व्यक्त केला.रावणाला जशी दहा तोंडे होती त्याप्रमाणे त्यातील तीन तोंडे उभे आहेत.जसे लोकसभा निवडणुकीत तुम्ही खा.राऊत यांना निवडून दिलेत,तोच चमत्कार आताही करा असे आवाहन दीपक केसरकर यांनी केले.
कोणावर टीका करून आपण जिंकणार नसून केलेल्या विकास कामांच्या जोरावर याठिकाणी मते मागणार आहोत.जनतेला माहीत आहे विकास कोण करू शकतो, त्यामुळे समृद्ध आणि सुसंस्कृत जिल्हा घडविण्यासाठी शिवबंधन आवश्यक,घरोघरी शिवसेना पोचली पाहिजे,केलेली विकासकामे जनतेपर्यंत पोहोचवा.२७०० कोटींचा निधी आणला हे सर्वांनी लक्षात ठेवून जनतेला विकास कामांची माहिती द्या असे आवाहन पालकमंत्री दीपक केसरकर यांनी वेंगुर्ले तालुक्यातील आडेली येथील प्रचार सभा शुभारंभ करण्यात आला. भाजपचे निष्ठावंत आपल्यासोबत. तिन्ही उमेदवार राणे समर्थकच,जिथे राणेंना घाबरलो नाही तिथे राजन तेलींना का घाबरणार?मी कोणावर टीका करत नाही पण माझ्यावर केलेली टीकाही सहन करणार नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here