मालवणी महोत्सवात यंदा साकारली जाणार आंबेगाव क्षेत्रापाल मंदिराची प्रतिकृती

0
362

सावंतवाडी, दि. ०९ : मुंबई अनंत भोसले मैदान बोरीवली मागाठाणे येथे होणाऱ्या मालवणी महोत्सवात आंबेगाव श्री देव क्षेत्रपाल मंदिराची प्रतिकृती करण्यात येणार आहे. मुंबई येथे होणाऱ्या महोत्सवाला आंबेगावचे ग्रामदैवत श्री देव लिंग क्षेत्रापाल मंदिराची प्रतिकृती साकारण्याचा मान मिळाला आहे . मालवणी महोत्सव दि. ३ ते १० नोव्हेंबर या कालावधीत साजरा होणार आहे. मालवणी ची लोक कला दशावतारी नाटक या महोत्सवात आठ दिवस सादर होणार आहे. मुंबईतील कोकणी माणूस या महोत्सवाची आतुरतेने वाट पाहत असतात. मुंबईत कोकणी माणूस हा महोत्सव गेली २४ वर्षे साजरा करत आहे. या महोत्सवाची प्रतिकृती चे उद्घाटन आमदार श्री विलासभाई पोतनीस यांच्यावहस्ते कऱण्यात आले. यावेळी आंबेगाव गावातील गावकरी प्रदीप परब, आनंद परब, समीर परब, बाबाजी परब, रामदास नाईक, अशोक दवली, उमाजी परब, रुपेश परब, सतीश नाईक, सागर परब , अविनाश बहादूर, दीपक नाईक, रोहिदास गावडे, प्रवीण केरकर, आदी मुंबईत राहणारे उपस्थिती होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here