कुसूरमध्ये आजारपणाला कंटाळून युवकाची आत्महत्या…!

0
1159

वैभववाडी : दि. ०९ : तालुक्यातील कुंभवडे नं. १ शाळेचे शिक्षक प्रकाश नारकर यांचा मुलगा तेजस प्रकाश नारकर (२२) याने आजारपणाला कंटाळून कुसूर सुतारवाडी येथील नदीच्या डोहात उडी घेऊन आत्महत्या केली. ही घटना बुधवारी सकाळी दहा वाजता घडली. याबाबत त्याचा भाऊ किरण नारकर याने पोलीसांना माहिती दिली. कुसूर सुतारवाडी येथील तेजस नारकर हा मुंबईत शिक्षण घेत होता. आजारपणामुळे तो गेल्या काही दिवसांपासून तो आपल्या मुळगावी कुसूर येथे आला होता. उपचाराला तो कंटाळला होता. बुधवारी सकाळी तो घरातून बाहेर निघून गेला होता. मात्र तो नेमका कुठे गेला हे घरातील कोणालाही माहीत नव्हते. बराच वेळ तो घरी न आल्यामुळे त्याची शोधाशोध सुरु झाली. कुसूर सुतारवाडी येथील शांतीनदी पात्राच्या डोहात त्याचा मृतदेह आढळून आला. याबाबत त्याचा भाऊ किरण नारकर याने पोलीसांना दिली. त्यानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यांनी मृतदेह पाण्यातून बाहेर काढून उंबर्डे प्राथमिक आरोग्य केंद्रात नेऊन शवविच्छेदन करण्यात आले. तेजसने आजारपणाला कंटाळून आत्महत्या केल्याचा प्राथमिक अदांज आहे. त्याच्या पश्चात आई, वडील, दोन भाऊ असा परिवार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here