कुडाळ शहरातील विकासकामे माझ्या विजयास हातभार लावतील : वैभव नाईक

0
516

कुडाळ : दि ९ : कुडाळ शहरातील शिवसेनेची बैठक आज अनंत मुक्ताई सभागृहात आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत संपन्न झाली. यावेळी नाईक म्हणाले आज कुडाळ शहराची बैठक म्हणजे कुडाळ तालुक्याचा मेळावा वाटला. एवढी मोठी उपस्थिती पाहुन आम्ही केलेली कुडाळ शहर विकासाची कामे ही माझ्या विजयास हातभार लावतील. समोरचा उमेदवार कोण आहे याची फिकिर मी करीत नसुन शिवसेना आणि मतदार यांची ताकद माझ्या पाठिशी आहे. पाच वर्षांच्या काळात मतदारांमध्ये राहाण्याचे काम केले. मी बाहेरचा उमेदवार म्हणून टिका होते. त्यापेक्षा मी कुडाळ मालवण मधिल लोकांना आपला माणुस वाटतो, हे महत्वाचे असे आम नाईक म्हणाले. यावेळी शिवसेनेचे कुडाळ शहर निरीक्षक अतुल बंगे, मा जि प सदस्य संजय भोगटे, शिवसेनेचे संतोष शिरसाट, युवासेना जिल्हा रसमन्वयक सुशीला चिंदरकर, युवासेना शहर अध्यक्ष कृष्णा तेली युवासेना जिल्हा प्रमुख मंदार शिरसाट, कुडाळ सभापती राजन जाधव, नगरसेवक सचिन काळप, प्रन्या राणे, मेघा सुकि, श्रेयाताई गवंडे, जिवन बांदेकर,उपस्थित होते. यावेळी कुडाळ शहरातील सामाजिक कार्यकर्ते जयराम डीगसकर यांना शिवबंधन अतुल बंगे यांच्या हस्ते बांधुन शिवसेना प्रवेश देण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here