कणकवली आंब्रड विभागात शिवसेनेत ‘इनकमिंग’

0
829

कणकवली : दि ९ : कुपवडे माजी सरपंच दाजी तवटे स्वगृही परतले. तर, सोनवडे तर्फ कळसुलीचे भिकाजी बाबू चव्हाण भरणीचे अक्षय मेस्त्री, गणपत मेस्त्री यांसह ५०-६० कार्यकर्त्यांनी खासदार विनायक राऊत यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. सोनवडे तर्फ कळसुलीचे स्वाभिमानचे जेष्ठ कार्यकर्ते भिकाजी चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली नरेंद्र चव्हाण, प्रकाश चव्हाण, विजय चव्हाण, नामदेव चव्हाण, रमेश चव्हाण, सुरेश चव्हाण, धर्माजी चव्हाण, प्रमिला चव्हाण, नम्रता चव्हाण, संगीता चव्हाण, स्वप्नाली चव्हाण, सायली चव्हाण, दिव्या चव्हाण, आनंद चव्हाण, रेश्मा चव्हाण, नमिता चव्हाण, मंगला चव्हाण, शुभदा चव्हाण, स्नेहलता चव्हाण, नेहा चव्हाण, आत्माराम चव्हाण, सत्यवती चव्हाण, सरिता चव्हाण, सागर चव्हाण, हरिश्चंद्र चव्हाण, रुख्मिनी चव्हाण, शितल चव्हाण, प्रिया मेस्त्री, पूजा मेस्त्री आदी  ५०-६० कार्यकर्तेनी शिवसेना सचिव खा.विनायक राऊत यांच्या हस्ते ‘शिवबंधन’ बांधून शिवसेनेत प्रवेश केला. शिवसेनेचे कार्यसम्राट आमदार वैभव नाईक यांच्या विकासाच्या व्हीजन आणि विकास कामांचा धडाका यावर विश्वास ठेवून शिवसेना चा भगवा कायम खांद्यावर घेण्याचा पण केला आहे. आजच्या प्रवेशा करीता माजी पं स उपसभापती भिवा घाडी, शाखाप्रमुख गुरुनाथ मेस्त्री, मोहन धोंडी घाडी, शिवसेनेचे जेष्ठ कार्यकर्ते मोहन राघो घाडी,  कांशीराम घाडी,दीपक घाडी, राजेश घाडी यांनी विशेष प्रयत्न केला.प्रवेशकर्त्यांचे महिला आघाडी जिल्हाप्रमुख जान्हवी सावंत, ग्राहक संरक्षण जिल्हाप्रमुख डॉ. प्रविण सावंत, विभागप्रमुख विकास राऊळ, युवासेना विभागप्रमुख निशांत तेरसे, युवासेना शाखाप्रमुख स्वप्नील राणे यांनी स्वागत केले.गेल्या अनेक दिवसांपासून आंब्रड विभागात प्रत्येक गावातील शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे अजूनही अनेक कार्यकर्ते संपर्कात आहेत त्यामूळे आंब्रड विभाग हा शिवसेनेचा बालेकिल्ला होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here