रोटरी क्लब ऑफ कुडाळ आयोजित ह्रदयदोष असणा-या मुलांसाठी भव्य ह्रदयरोग तपासणी शिबिर

0
226

कुडाळ : दि. १५ : सलग तिसऱ्या वर्षी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जन्मतःच ह्रदयदोष असणार्‍या लहान जीवांना नवसंजीवनी स्वरूपात जगण्याची नवी उमेद निर्माण करण्यासाठी रोटरी क्लब ऑफ कुडाळ ने पुढाकार घेत प्रसिद्ध स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. संजय निगुडकर यांच्या श्री गणेश हाॅस्पीटल कुडाळ येथे १७ नोव्हेंबर रोजी सकाळी ९ दुपारी 2 यावेळेत भव्य बालह्रदयदोष तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. जन्मतःच ह्रदयदोषासारख्या गंभीर आजारावरील शस्त्रक्रिया करण्यासाठी सुमारे 6ते7लाख खर्च येत असल्याने परिस्थितीने गरिब कुटुंबाला शक्य होत नसल्याने अनेक मुलांना नवीन जगण्याची उमेद मिळत नव्हती समाजातील हीच गंभीर समस्या दूर करण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर कार्य करणाऱ्या रोटरी क्लब ऑफ कुडाळ ने पुढाकार घेत डॉ संजय निगुडकर यांच्या विशेष प्रयत्नाने मुंबई च्या कोकिलाबेन हॉस्पिटल चे नामांकित बालह्रदयरोगतज्ज्ञ डॉ प्रशांत बोभाटे यांच्या उपस्थितीत गेली 3 वर्षे डॉ निगुडकर यांच्या श्री गणेश हाॅस्पीटल येथे भव्य ह्रदयरोग तपासणी शिबिर आयोजित करून या शिबिरामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जन्मतःच ह्रदयदोष असलेल्या 200 मुलांची तपासणी करण्यात आली व आतापर्यंत 67 मुलांवर मुंबई च्या कोकिलाबेन हाॅस्पीटल येथे अत्यल्प दरात यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली तर 17मुलांची मोफत शस्त्रक्रिया करण्यात आली यामध्ये संपूर्णशस्त्रक्रियेचा खर्च रोटरी क्लब, कोकिलाबेन हाॅस्पीटल मुंबई, श्री सिध्दविनायक ट्रस्ट मुंबई, सलमान खान चॅरिटेबल ट्रस्ट, मुख्यमंत्री सहाय्यता निधी यांचे सहकार्य घेण्यात आले. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जगण्याची उमेद सोडणा-या ह्रदयदोष मुलांसाठी नवसंजीवनी ठरणारा हा रोटरी क्लब ऑफ कुडाळ चा उपक्रम महत्वाचा ठरल्याने याहीवर्षी १७ नोव्हेंबर ला सकाळी ९ ते दुपारी २ या वेळेत डॉ संजय निगुडकर यांच्या श्री गणेश हाॅस्पिटल येथे रोटरी क्लब ऑफ कुडाळ ने भव्य ह्रदयरोग तपासणी शिबिर आयोजित केले असून या शिबिराला कोकिलाबेन हाॅस्पिटलचे बालह्रदयरोगतज्ज्ञ डॉ प्रशांत बोभाटे मुलांची तपासणी करणार आहेत यासाठी ह्रदयदोष सुक्ष्म निदान करण्यासाठी महत्वाची असलेली ६५ लाखाची मशीन 3 वर्षापूर्वी डॉ संजय निगुडकर यांनी उपलब्ध केलेली आहे. त्या या शिबिरास सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जन्मतःच ह्रदयदोष मुलांनी पालकासंहित सहभागी होवून लाभ घेण्याचे आवाहन रोटरी क्लब ऑफ कुडाळ चे अध्यक्ष एकनाथ पिंगुळकर, सेक्रेटरी सचिन मदने, खजिनदार अभिषेक माने, डॉ. संजय निगुडकर यांनी केले आहे. या शिबिराच्या उद्घाटन ला मान जिल्हाधिकारी डॉ दिलीप पांढरपट्टे, मुख्यकार्यकारिअधिकारी के मंजुलक्षमी, जिल्हाशल्यचिकित्सक डॉ धनंजय चाकूरकर यांना निमंत्रीत केले आहे रोटरीचे सर्व पदाधिकारी व सदस्य उपस्थित राहणार आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here