दिव्यांग – निराधार महिलांचं दोडामार्ग तहसीलसमोर भीकमांगो आंदोलन….!

0
304

दोडामार्ग : दि. १५ :  अंत्योदय योजनेचा लाभ मिळण्यासाठी व अन्य मागणीसाठी आज शुक्रवार दिनांक १५ नोव्हेंबर २०१९ पासून तहसीलदार कार्यालयासमोर दिव्यांग व निराधार महिला पुरुष संघ दोडामार्ग,अध्यक्ष साबाजी उमाकांत सावंत यांच्या नेतृत्वाखाली बेमुदत आंदोलन सुरू केले आहे.या आंदोलनात अपंग महिला पुरुष मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत. अंत्योदय योजनेचा लाभ मिळण्यासाठी व अन्य मागणीसाठी जानेवारी २०१९ या महिन्यात दोडामार्ग तहसील कार्यालया समोर आंदोलन केलेले होते. परंतु सदर आंदोलनाच्या वेळी तहसीलदार दोडामार्ग यांनी दोन ते तीन महिन्यांच्या आत चौकशी करून अंत्योदय योजनेचा लाभ दिला जाईल व सदर विषयी कार्यवाही सुरू आहे असे आश्वासन दिले होते. परंतु सदर विषयी एक वर्ष होत आले तरी या विषयी कोणत्याही प्रकारची कार्यवाही झालेली नाही अथवा एखादी दिव्यांग व निराधार महिला तहसीलदार कार्यालयात गेले असता नुसते आश्वासन दिले जातात या विषयी अधिकारी ठोस निर्णय अथवा कार्यवाही करत नाहीत. त्यामुळे दिव्यांग सेवा संघ व निराधार महिला पुरुषांनी अंत्योदय रेशनकार्ड दया नाही तर एक मूठभर भीक घाला या भूमिकेवर ठाम राहत दिव्यांग व निराधार महिला पुरुष संघ दोडामार्ग
अध्यक्ष साबाजी उमाकांत सावंत यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन सुरू केले आहे.  दरम्यान मनसेचे नेते प्रकाश रेडकर, काँग्रेसचे तालुका अध्यक्ष बाळा धाऊसकर, वैभव इनामदार, संजय देसाई, सुर्या नाईक, सह आदींनी आंदोलस्थळी आंदोलन कर्त्यांना भेट, तहसीलदार मोरेश्वर हाडके यांनीही भेट दिली आपल्या मागण्या रास्त आहेत जे प्रस्ताव पेंडिंग आहेत ते येत्या पंधरा दिवसांत पूर्ण करून देण्याचे आश्वासन दिले मात्र प्रत्येकवेळी आश्वासने दिली जातात ठोस निर्णय दिला जात नाही आम्हांला जो पर्यंत लेखी पत्र देत नाहीत तो पर्यंत हे आंदोलन मागे घेणार नाही प्रशासनाला आमच्या मागण्या पूर्ण करता येत नसतील तर आमच्या झोळीत एक मूठ धान्य घाला आम्ही आंदोलन तात्काळ मागे घेतो असे साबाजी सावंत यांनी सांगून जो पर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाहीत तो पर्यंत हे आंदोलन सुरूच ठेवणार असल्याचे सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here