…तर समाजाने सतर्क राहिले पाहिजे : गायत्री पाटील

0
325

कुडाळ : दि. १५ : बालकांना वरील अत्याचारांना प्रतिबंध करण्याची जबाबदारी समाजातील सर्वच घटकांची आहे असे प्रतिपादन कुडाळ पोलिस ठाण्याच्या पोलिस उपनिरीक्षक गायत्री पाटील यांनी केले. बालकांच्या लैंगिक शोषण बाबतचे अत्याचार सामाजिक काळीमेच्या भीतीने लपवून न ठेवता पोलिसांना त्वरित कळवावे असे आवाहन गायत्री पाटील यांनी केले. बालकांचे हक्क क व सुरक्षितता सप्ताह १४ ते २० नोव्हेंबर या कालावधीत साजरा करण्यात येत आहे. बालक दिन गुरुवारी मुळदे येथील उद्यान विद्या महाविद्यालयात कुडाळ पोलीस ठाण्याच्या वतीने जनजागृती ती व मुलांना याबाबत माहिती व्हावी यासाठी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर प्रदीप हळदणकर वकील नीलांगी रांगणेकर व अन्य प्राध्यापक विद्यार्थी उपस्थित होते. बालकांचे लैंगिक अत्याचार कायदा २०१२ च्या अनुषंगाने बालकांचे हक्क व सुरक्षितता तसेच अत्याचाराविषयी यावेळी गायत्री पाटील यांनी सविस्तर माहिती कॉलेजच्या उपस्थित २५० विद्यार्थ्यांना दिली अत्याचाराला प्रतिबंध कसा करावा हे सांगताना पाटील यांनी बालकांवरील अत्याचार समजून घेणे यांची दखल घेणे त्यामागचे कारण जाणून घेणे आणि त्यानंतर प्रतिबंधक करणे आवश्यक असल्याचे यांनी यावेळी बोलताना सांगितले बालकांवर अत्याचार होत असल्या ते समजले तर चाइल्ड हेल्पलाईन 1098 व व पोलीस हेल्पलाईन 103 अगर स्थानिक पोलिस ठाण्यात संपर्क साधावा असे आवाहन कुडाळ पोलीस उपनिरीक्षक गायत्री पाटील यांनी केले तसेच बालकांचा संदर्भात विविध कायदे बालकांचे हक्क बालविवाह याबाबत माहिती देऊन समाजाने सतर्क राहून असे गुन्हे घडणार नाहीत याची दक्षता घ्यावी असे सांगितले वकील रांगणेकर यांनी रॅगिंग संदर्भात माहिती देऊन कायद्यात रॅगिंग विरोधात क** शिक्षा असल्याचे सांगितले रॅगिंग करून मुलाचा हेतु साध्य होत नाही याउलट रॅगिंग करणाऱ्यांना त्रास होतो पोलीस व कायद्याच्या कारवाईला सामोरे जावे लागते असे सांगितले यावेळी उद्यान विद्या महाविद्यालयाचे मगदूम डॉक्टर नीलिमा भोसले डॉक्टर संदीप गुरव प्रकाश पोटफोडे हर्षवर्धन वाघ पोलीस कर्मचारी डोमिनोज डिसोजा एन एन कदम आदी उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक नीलिमा भोसले यांनी केले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here