आरोपीला न्यायालयात नेताना उपनिरीक्षकाचा ह्दयविकाराच्या झटक्याने मृत्यू

0
367

देवगड : देवगड तालुक्यातील जामसंडे – भटवाडीचे भूमीपुत्र आणि नागपाडा पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक नरेंद्र उर्फ भाई पाटकर हे अहमदाबाद येथे एका गुन्ह्यातील आरोपीला वॉरंट बजावण्यासाठी जात असताना एक्सप्रेसमध्येच त्यांचा प्रवासादरम्यान ह्दयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याने सर्वांनाच धक्का बसला आहे. नागपाडा एटीएस. युनिटमध्ये पाटकर हे उपनिरीक्षक पदावर कार्यरत होते. सोमवारी सकाळी ते नेहमीप्रमाणे कर्तव्यावर हजर झाले. ते धाडसी आणि कर्तव्यनिष्ठ अधिकारी होते. त्यांच्या मनमिळावू स्वभावाने ते सर्वांच्याच जवळ होते. अशात सोमवारी काम उरकून ते अहमदाबाद येथे एका जुन्या गुन्ह्यातील आरोपीला वॉरंट बजावण्यासाठी संध्याकाळी ६ वा. कार्यालयातून निघाले. रात्रीच्या अहमदाबाद एक्सप्रेसमधून ते प्रवास करित होते. गाडी अहमदाबाद स्थानकात थांबताच, तेथील रेल्वे पोलिसांना पाटकर झोपलेले दिसून आले. त्यांनी त्यांना उठविण्याचा प्रयत्न केला मात्र, काहीच प्रतिसाद न आल्याने त्यांना जवळच्या रूग्णालयात दाखल केले असता त्यांना मृत घोषित करण्यात आले. त्यांना ह्दयविकाराचा झटका आल्याचे समोर आले. मंगळवारी पहाटेच्या सुमारास त्यांचा मृतदेह मुंबईत आणण्यात आला. नरेंद्र पाटकर हे जामसंडे बाजारपेठेतील स्वामी समर्थ टी स्टॉलचे मालक सुभाष पाटकर यांचे बंधु होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here