मालवण हवाई सफरीला पर्यटकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

0
478
मालवण : कोकण किनारपट्टीवरील पहिल्या हेलिकॉप्टर सफर उपक्रमाची रविवारी सांगता झाली. स्थानिक नागरिकांसह पर्यटक असे मिळून सुमारे २१० जणांनी या सफरीचा आनंद लुटला. कोकण किनारपट्टीवर प्रामुख्याने सिंधुदुर्गच्या मालवण या केंद्रस्थानी पर्यटकांचा ओढा गेल्या काही वर्षांत मोठ्या प्रमाणात वाढला आहे. स्कुबा डायव्हिंग, वॉटर स्पोर्ट, पॅरासेलिंग आदी समुद्री पर्यटनाकडे पर्यटक आकर्षिले जात असताना मालवणचे युवा पर्यटन व्यावसायिक रुपेश प्रभु, अन्वय प्रभु व रश्मीन रोगे यांनी पर्यटकांना हेलिकॉप्टरद्वारे सिंधुदुर्ग सफर ही अनोखी संकल्पना प्रत्यक्षात उतरवली. या हेलिकॉप्टर सफरमधुन पर्यटकांना किल्ले सिंधुदुर्ग व मालवण किनारपट्टीचे मनमोहक दृश्य अवकाशातून लुटता आले. दोन दिवस चाललेल्या या पहिल्या वहिल्या उपक्रमाच्या पहिल्या दिवशी ११० तर रविवारी दुसऱ्या दिवशी १०० असे मिळून २१० पर्यटक व जिल्हावसीयांच्या हेलिकॉप्टर सफरीचा आनंद लुटला. रविवारी या उपक्रमाच्या पहिल्या टप्प्याची सांगता झाली. जिल्हावासीयांची मागणी असल्यास पुन्हा हा उपक्रम राबवणार असल्याची माहिती आयोजक अन्वय प्रभू यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here