निरवडे येथे चोरट्यांनी ५ बंगले फोडले ; सुमारे ४५ हजाराची रोकड लंपास

0
419
सावंतवाडी : मंगळवारी रात्री सावंतवाडी तालुक्यातील निरवडे येथील विष्णूसृष्टी या वसाहतीतील पांच बंगले चोरट्यांनी फोडून सुमारे ४५ हजाराची रोकड  लंपास केली.  सर्व बंगल्यातील माणसे परगावी राहत असल्याचा फायदा घेत चोरट्यांनी हा डल्ला मारलाय. या चोरीवरून जिल्ह्यातील फोटो स्टुडिओना लक्ष केल्यानंतर चोरट्यांनी आता बंद बंगल्याना लक्ष केलेआहे हे स्पष्ट होत आहे. मंगळवारी रात्री निरवडे येथील पाच बंगले चोरट्यांनी फोडले. या बंगल्यातील सुमारे ४५ हजाराची रोकड चोरट्यांनी लंपास केलीय. हे बंगले हेमंत सोनावणे, नंदिता प्रभू, शाहिदा नाईक सचिन नाईक, प्रकाश महादेव प्रभू यांच्या मालकीचे आहेत. हे सर्व बंगल्यातील माणसे परगावी राहत असल्याचा फायदा घेत दरवाज्याची कुलुप तोडून चोरट्यांनी बंगल्यात प्रवेश केला. या चोरीनंतर बंगले मालकांनी सावंतवाडी पोलीस ठाण्यात जात तक्रार दाखल केली आहे. यानंतर ठसे तज्ञ येऊन पाहणी केली असता कोणताही पुरावा आढळून आला नाही.  निरवडे चोरी प्रकरणीही निरवडे सरपंच प्रमोद गावडे यांनी चोरट्याना पोलिसांनी लवकरात लवकर जेरबंद करावे अशी मागणी केली आहे. चोरी सत्र सुरूच राहिल्याने पोलीस यावर कसा लगाम लावणार आहेत याकडे सर्वांचे लक्ष लागलेय.  सावंतवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक अरुण सावंत हे तपास करत आहेत.  

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here