पाट गावच्या ग्रामविस्तार अधिकारी बदलीप्रकरणी ग्रामस्थ आक्रमक

0
377
: पाट गावचा ग्राम विस्तार अधिकारी यांच्या बदली प्रकरणी लोक आक्रमक झाले. पाट ग्रामविस्तार अधिकारी सौ. एस. बी. कोकरे यांच्या अचानक बदलीवरून पाट ग्रामस्थानी आक्रमक होत याबाबत कुडाळ पंचायत समिती सभापती राजन जाधव यांच्याशी चर्चा केली. बदली रद्द करा अन्यथा आंदोलन करू असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. पाट ग्रामविस्तार अधिकारी सौ.एस.बी.कोकरे यांची  अचानक बदली करण्यात आलीय. या बदली प्रकरणी सोमवारी जि. प. सदस्या  वर्षा कुडाळकर व पाट पंचायत समिती सदस्य डाॅ. सुबोध माधव यांच्या नेतृत्वाखाली महेश वेळकर, सरपंच रिती राऊळ, मंदार पाटकर, नितीन माधव, उमेश प्रभु आदी ग्रामस्थांनी सभापती व गटविकासअधिकाऱ्यांची भेट घेतली. प्रभारी ग्रामविस्तार अधिकारी नकोच अशी भूमिका त्यांनी घेतली. सदर बदली ही वरिष्ठ स्तरावरुन झाली असून यांनी खरतर पाट गावाला चांगला ग्रामविस्तार अधिकारी हवा आहे. असे गटविकास अधिकारी चव्हाण यांनी सांगितले. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here