युनायटेड फोरम ऑफ बँक युनियनच्या बँक कर्मचाऱ्यांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

0
429
सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात ३० व ३१ मे रोजी युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन बँक कर्मचारी अधिकाऱ्यांचा दोन दिवसाचा संप सुरू आहे. या संपात शासनाने वेळीच लक्ष घालावे यासाठी जिल्ह्यातील बँकांच्या कर्मचाऱ्यांनी एकत्र येत जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. सेवा शर्थी व वेतन कराराची मुदत दिनांक ३१ मे रोजी संपत असून नियमानुसार नव्या वेतन कराराबद्दलचे मागणी पत्र आयबीएला सादर करूनही आयबीएकडून पहिल्या दहा फेऱ्यांमध्ये व्यवस्थापनाच्या मागण्या व कर्मचाऱ्यांच्या आर्थिक मागण्या सोडून इतर विषयांवर चर्चा करण्यात आली. जेव्हा आर्थिक देकार देण्याची वेळ आली तेव्हा आयबीएने वेतनवाढीचा २ टक्के प्रस्ताव पुढे केला. हा प्रस्ताव आम्हा संघटनेच्या दृष्टीने अपमानास्पद असून केंद्र सरकारने हस्तक्षेप करावा अशी आम्हा संघटनेची मागणी आहे. नोटबंदीसारखा मोठा प्रयोग जनधन खात्याची व्यापक हाताळणी विविध सरकारी योजनांची अंमलबजावणी करताना शासनाने बँकांचे कौतुकही केले. परंतु आर्थिक लाभ देताना हात आखडते घेतले या सर्वाचा निषेध म्हणून बँक कर्मचारी व अधिकारी दोन दिवसांच्या गेले आहेत. परिस्थिती अशीच राहिल्यास कर्मचाऱ्यांची एकजूट करून यापेक्षाही तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असे रानडे यांनी सांगितले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here