आमदार वैभव नाईक यांनी घेतली जिल्हाशल्य चिकित्सक डॉं. धनंजय चाकूरकर यांची भेट

0
400
सिंधुदुर्ग : नवनियुक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. धनंजय चाकूरकर यांची आमदार वैभव नाईक यांनी भेट घेऊन आरोग्य यंत्रणेबाबत चर्चा केली. हॉस्पिटलम मधील रुग्णाचीही चौकशी केली. पावसाळा सुरू झाला असून जिल्ह्यात साथरोग यंत्रणा कशा प्रकारे काम करत आहेत, याच्या पाहणीसाठी आमदार वैभव नाईक यांनी शुक्रवारी जिल्हाशल्य चिकित्सक डॉ. धनंजय चाकूरकर यांची भेट घेऊन त्यांना शुभेच्छा दिल्या. रुग्ण व औषध भांडाराचीही पाहणी केली. येथील पेशंंटांना कोणतीही अडचण भासू नये, यासाठी काळजी घेण्यास सांगितल. यावेळी जि. प. सदस्य अमरसेंन सावंत, ओरोस ग्रामपंचायत सदस्य नागेश ओरोस्कर, छोटू पारकर रुपेश शिरोडकर आदी उपस्थित होते.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here