कोकणच्या इतिहासात प्रथमच जि.प. शाळेची ‘गगन भरारी’..! ; २४ विद्यार्थ्यांची टीम विमानाने केरळला !

0
713

सावंतवाडी : उत्तुंग धेय्य आणि अपार जिद्द असेल तर ‘sky is the limit’… सिंधुदुर्ग जिल्ह्यातील २४ विद्यार्थ्यांची टीम मंगळवारी केरळ येथे वैज्ञानिक सहलीसाठी चक्क विमानाने रवाना झाली. या विद्यार्थ्यांच्या यशाचा अवघ्या कोकणला अभिमान आहे…पाहूया स्पेशल रिपोर्ट…. जिल्हा परिषदेच्या शाळांना अनेक समस्या असतात. पण त्यातूनही काही शाळांना खुप एनर्जी मिळते ती अशा विद्यार्थ्यांपासून. सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाच्यावतीने भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम सिंधुदुर्ग प्रज्ञाशोध परीक्षा काही महिन्यापूर्वी घेण्यात आली होती. या परीक्षेमध्ये तालुक्यातून प्रथम तीन क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या एकूण २४ विद्यार्थ्यांची आयएसआरओ वैज्ञानिक सहलीसाठी निवड करण्यात आली. मंगळवारी सकाळी २४ विद्यार्थ्यांची निवडलेली टीम केरळ येथील विक्रम साराभाई अंतराळ संशोधन संस्था थुंबा – तिरुअनंतपुरम् येथे रवाना झाली. या टीमसोबत जिल्हा परिषद अध्यक्षा सौ. रेश्मा सावंत, शिक्षण सभापती प्रीतेश राऊळ, शिक्षणाधिकारी अशोक कडूस, डी.के. टुरिझमचे डी.के. सावंत जातीनिशी असणार आहेत. मंगळवारी सकाळी जिल्हा परिषद येथे सहलीवर निघालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. या सहलीचे संपूर्ण नियोजन सांभाळत असलेले डी. के. टुरिझमचे मालक डी. के. सावंत यांच्या मळगाव येथील सेंटरवर सहलीसाठी निघालेली पूर्ण टीम नाष्ट्यासाठी थांबली. एकूणच या वैज्ञानिक सहलीमागाचा हेतू आणि त्यामागची प्रेरणा याबाबत ‘सिंधुदुर्ग लाईव्ह’नेसंपूर्ण टीमसोबत केलेली ही खास बातचीत…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here