सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग साईकृपा शक्ती बहुउद्देशीय शिक्षण संस्था कसाल व संपर्क कार्यालय ओरोस जैतापकर कॉलनी या संस्थेच्या वतीने व स्वाभिमान संघटना महाराष्ट्र तसेच नगराध्यक्ष नगरपंचायत कुडाळ यांच्या माध्यमातून दिनांक २३ जून रोजी आमदार नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त दिव्यांग बांधवांचा जिल्हास्तरीय मेळावा कुडाळेश्वर मंदिर येथे आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यामध्ये दिव्यांग बांधवाना व त्यांच्या मुलांना शैक्षणिक साहित्य वाटप केले जाणार आहे. आमदार नितेश राणे व कुडाळ नगरपंचायत नगराध्यक्ष विनायक राणे यांच्या सहकार्यातून होत आहे यामध्ये नोंदणी केली जाणार आहे.