‘मास्टर माईंड’ तावडीत… स्वाभिमानचे ‘मिशन फत्ते’

0
449

सावंतवाडी  : कोकणातल्या युवकांची छळवणूक आणि पिळवणूक करणाऱ्या चेन मार्केटिंगचा सिंधुदुर्ग लाईव्ह ने सर्वप्रथम  पर्दाफाश केल्यानंतर आमदार नितेश राणे यांची स्वाभिमान संघटना कोकणातील तरुणांची सुटका करण्यासाठी राज्यभरात रस्त्यावर उतरली. चेन मार्केटिंगच्या राज्यभरातील कार्यालयांवर धडक सत्र सुरु केलं. शुक्रवारी कल्याण येथील कार्यालयावर धडक मारल्यानंतर शनिवारी औरंगाबाद येथील कंपनीच्या कार्यालयावर गमिनिकाव्याने धडक दिली… यात कंपनीच्या ‘मास्टर माईंड’ ला तावडीत घेत बऱ्याच तरुणांची सुटका केली. स्वाभिमान च्या या फत्ते मिशनमुळे सुटका झालेल्या मुलांच्या पालकांनी स्वाभिमान चे आभार मानले असून आमदार नितेश राणे यांनी मिशन फत्ते केलेल्या कार्यकर्यांचे अभिनंदन केलंय. चेन मार्केटिंगमध्ये कोकणातील हजारो मुले अडकली आहेत याबाबतचा पोलखोल सर्वप्रथम सिंधुदुर्ग लाईव्ह’ने केला. सिंधुदुर्ग लाईव्ह च्या या पोलखोलाची गंभीर दखल आमदार नितेश राणे यांनी घेतली. नुसती दखल घेतली नाही तर लगेच आमदार नितेश राणे यांची स्वाभिमान संघटना राज्यभरात रस्त्यावर उतरली. राज्यभरातील कंपनीच्या कार्यालयांवर स्वाभिमानने धडकसत्र सुरु केलं. दरम्यान शनिवारी सकाळी गनिमीकाव्याने स्वाभिमानची ब्रिगेड औरंगाबादचे  माजी महापौर सुदाम मामा सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली कंपनीच्या कार्यालयात घुसली. कार्यालयात कोकणातील असंख्य तरुणांना कोंडून ठेवण्यात आले होते. बऱ्याच तरुणाची सुटका स्वाभिमानने केली. तर चेन मार्केटिंगचा मास्टरमाईंड यावेळी स्वाभिमानच्या तावडीत सापडला. स्वाभिमानचे औरंगाबाद जिल्हाध्यक्ष निलेश भोसले, कुणाल गिल, योगेश शिंदे, विक्रांत देहाडे, संदीप कांबळे, वैभव चौधरी यांच्यासह कार्यकर्त्यांनी मोहीम फत्ते केली. मुलांच्या पालकांनी स्वाभिमानचे आभार मानले. तर मोहीम फत्ते करणाऱ्या टीमचे आमदार नितेश राणे यांनी अभिनंदन केले. दरम्यान या मोहिमेच्या आदल्यादिवशी अर्थात शुक्रवारी मुंबईच्या स्वाभिमानने कल्याण येथे कंपनीच्या कार्यालयावर धडक मारली. ही धडक  स्वाभिमानच्या प्रशांत सुधाला यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी दिली. यावेळी कमलेश राणे, सुशील यादव, विजयश्री पाटील, वसीम मोमीम, यासह अन्य कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी कार्यकर्त्यांनी उपस्थित मुलांच्या मोबाईलवरून पालकांशी संवाद साधला त्यावेळी पालकांनी आमच्या मुलांनी सात आठ महिने संपर्कच केला नसल्याचे निदर्शनास आले. तर मुलांना सात महिन्यात फक्त ७ हजार पगार मिळाल्याचे मुलांनी कार्यकर्त्यांना सांगितले. मात्र मुलांना संमोहित केल्यामुळे कंपनीच्या विरोधात बोलायची हींमत झाली नाही. उलट स्वखुशीने कंपनीत काम करत असल्याचे या तरुणांनी सांगितले. तर कंपनीनेच स्वाभिमानच्या विरोधात पोलिसात तक्रार केली. कंपनीच्या तक्रारीमुळे कल्याण पोलिसांनी स्वाभिमानच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. मात्र कल्याण पोलिसांना नेमकी वस्तुस्थिती आमदार नितेश राणे यानी समजून सांगितल्यानंतर थक्क झालेल्या पोलिसांनी स्वभिमानच्या कार्यकर्त्यांना सोडून दिल. एकूणच सिंधुदुर्ग लाईव्हने सर्वप्रथम या प्रकरणाचा पोलखोल केल्यानंतर कोकणातील तरुणांसाठी स्वाभिमानचे कार्यकर्ते राज्यभरात रस्त्यावर उतरले. ठिकठिकाणी स्वाभिमानने धडकसत्र सुरु केले आणि कोकणातील तरुणांची सुटका करण्यासाठी हाती घेतलेलं मिशन फत्ते केलं. सिंधुदुर्ग लाईव्ह च्या वृत्तानंतर शिवसेनेची सिंधुदुर्ग जिल्ह्याची युवासेना पुढे सरसावली. कोल्हापुर येथील कंपनीच्या कार्यालयावर धडक देवून कोकणचा स्वाभिमान दाखवून दिला.      

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here