मालवण – देऊळवाडा नागरिकांचे बांधकामच्या विरोधात ‘श्राद्ध’ आंदोलन

0
324

मालवण : मालवण देऊळवाडा येथे पडलेल्या खड्ड्यांमुळे नागरिक चांगलेच आक्रमक झाले. सार्वजनिक बांधकामच्या विरोधात ‘श्राद्ध’ आंदोलन करत निषेध केला. मालवण शहरातील भरड नाका ते देऊळवाडा पर्यंत रस्त्याची अक्षरशः दयनीय अवस्था झालीय. रस्त्यात खड्डे कि खड्ड्यात रस्ते हेच समजत नाही. वाहनचालकांना खड्ड्यातून रस्ता शोधत वाहने चालवावी लागत आहेत. पावसाळ्यात या खड्ड्यांमध्ये पाणी साचल्याने खड्ड्यांचा अंदाज येत नसल्याने अनेक अपघातही घडले आहेत. मात्र, तरीही बांधकाम विभाग आणि लोकप्रतिनिधीनी लक्ष न दिल्याने नागरिक आक्रमक झाले. आज बांधकाम विभागाच्या विरोधात रस्त्यातच ‘श्राद्ध’ आंदोलन करत बांधकाम विभागाचा निषेध केला. यावेळी श्रेयस माणगावकर, बाळा माणगावकर, गणेश डीचवळकर, शरद मालवणकर, निखिल पारकर आदि उपस्थित होते. या आंदोलनाला वाहनचालकांनीही पाठींबा दिला. या खड्ड्यात पडून काही शाळकरी विद्यार्थी पडून जखमी झाले होते. अनेक दिवस खड्डे असूनही बांधकाम विभाग आणि लोकप्रतिनिधीना हे खड्डे दिसत नाही का ? असा सवालही नागरिकांनी यावेळी उपस्थित केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here