स्थानिक ठेकेदारांना ठेका द्या ; कुडाळ येथील कंत्राटी वीज कामगारांची मागणी

0
303
कुडाळ : स्थानिक ठेकेदारांना व स्थानिक संस्थांना कामगार पुरवठा करण्याचा ठेका देण्यात यावा अशी एकमुखी मागणी कुडाळ येथील संघटनेच्या बैठकीत करण्यात आली. तर संघटनेतील घटनेची पायमल्ली करून संघटनेची बदनामी करणारा आनंद लाड यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याचा निर्णय  घेण्यात आला. कुडाळ येथील कंत्राटी वीज कामगाराच्या यासभेला तब्बल अडीचशे ते तीनशे कंत्राटी कामगार उपस्थित होते. जिल्हा प्रतिनिधी अजय गावडे यांच्या अध्यक्षतेखाली ही महत्वाची बैठक झाली. कंत्राटी कामगार संघटनेचे सिंधुदुर्ग जिल्हा प्रतिनिधी अजय गावडे यांच्या अध्यक्षतेखाली कुडाळ येथे महत्वपुर्ण बैठक झाली. या बैठकीस पुरुषोत्तम राणे, संदेश देवनागरी, श्रीकृष्ण शिर्के, विवेक परब, अमोल हनुसवाडकर, राॅबीन फर्नांडिस, नंदकुमार पवार, प्रकाश परब, रोहिणी बटवलकर, प्रतिक्षा तोरसकर, गणेश गावडे, रूपेश देसाई, कौस्तुभ नाडकर्णी, रूपेश, युवराज यादव, तुकाराम शिरोडकर, चंद्रशेखर पणदूरकर, रघुनाथ जाधव यासह शेकडो कंत्राटी उपस्थित होते. कंत्राटी कामगार संघटनेवरून आनंद लाड यांनी जिल्हा प्रतिनिधी अजय गावडे यांच्यावर टीका केली होती. या टिकेला प्रत्युत्तर देण्यासाठी व अधीक्षक अभियंता चंद्रशेखर पाटील यांच्या मनमानी कारभाराची दखल घेण्यासाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीत संघटनेने विरोधी भूमिका घेतल्याबाबत आनंद लाड यांच्याबाबत तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. लाड यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याचा निर्णय झाला. तसेच स्थानिक संस्था व स्थानिक ठेकेदार यांना हा ठेका देण्यात यावा. अशी महत्वपूर्ण मागणी बैठकीत करण्यात आली.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here