इतिहासात सुंदरवाडी संस्थांनचं सोनेरी पान जोडणाऱ्या राजमाता काळाच्या पडद्याआड … कलेला राजाश्रय देणारा तारा निखळला.. सावंतवाडी बुडाली शोकसागरात..! ; पार्थिवाचे दर्शन सुरु ; सायंकाळी अंत्यसंस्कार

0
2938

सावंतवाडी : सावंतवाडी संस्थांनच्या राजमाता सत्वशीलादेवी भोसले यांचे बुधवारी रात्री निधन झाल्यानंतर सावंतवाडी संस्थानशी एकरूप असणारी जनता शोकसागरात बुडाली. रात्रीपासूनच राजमातांचे अखेरचं दर्शन घेण्यासाठी राजवाड्यात धाव घेतली. गुरुवारी सकाळपासून पार्थिवाचे दर्शन सुरु झाले. राजमातांच्या निधनामुळे शोकसागरात बुडालेल्या सावंतवाडीकरांनी उत्स्फूर्तपणे बाजारपेठ बंद ठेवत श्रद्धांजली वाहिली. तर सर्वच शाळा व कॉलेज यांना सुट्ट्या जाहीर करण्यात आल्या. वृद्धापकालाने आजारी असणाऱ्या सावंतवाडी संस्थानच्या राजमाता सत्वशीलादेवी भोसले यांची बुधवारी रात्री प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनामुळे अवघी सावंतवाडी शोकसागरात बुडाली आहे. रात्रीपासूनच राजवाडा परिसरात लोकांनी गर्दी केली होती. गुरुवारी सकाळी राजमातांचे पार्थिव दर्शनासाठी खुले झाले. शोकसागरात बुडालेल्या सावंतवाडीकरांनी उत्स्फूर्तपणे बाजारपेठ बंद ठेवत भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली. तर सावंतवाडी शहरातील शाळा व कॉलेज यांना सुट्टी जाहीर करण्यात आली. सकाळपासूनच अनेक मान्यवरांनी, लोकप्रतिनिधींनी राजमातांच्या पार्थिवाचे अखेरच दर्शन घेण्यासाठी धाव घेतली. सायंकाळी ४ वाजता शहरातून चितारआळी ते माठेवाडा अशी अंत्ययात्रा काढण्यात येणार आहे. माठेवाडा येथे अंतिम अंत्यसंस्कार होणारा आहेत. अंत्ययात्रेला तसेच अंत्यसंस्काराला होणारी गर्दी लक्षात घेता सावंतवाडी नगरपालिका आणि पोलीस यंत्रणेने विशेष दक्षता घेतली आहे.      

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here