लाकडी खेळण्यांंसाठी जगप्रसिद्ध असणारी चितारआळी राजमातांच्या निधनाने झाली सुन्न ; सर्व स्तरातील मान्यवरांची सावंतवाडीत धाव

0
612

सावंतवाडी : खरंतर सावंतवाडीची ओळख ही जगप्रसिद्ध लाकडी खेळण्यांनी केली. या लाकडी खेळण्याच्या व्यवसायाला संस्थानकाळात राजघराण्याकडून राजाश्रय मिळाला. त्यामुळे सावंतवाडीच्या चितारआळीतील ही कला जिवंत राहिली. त्यानंतर या कलेला खऱ्या अर्थाने उर्जितावस्था आणली ती म्हणजे राजमाता सत्वशीलादेवी भोसले यांनी. त्यांच्या निधनामुळे चितारआळी सुन्न झाली. चितारआळीतील सर्व व्यावसायिकांनी पूर्ण बाजारपेठ बंद ठेवून खऱ्या अर्थाने श्रद्धांजली वाहिली. बुधवारी रात्री राजमातांची प्राणज्योत मालवल्यानंतर सर्वच स्तरातील मान्यवरांनी आणि नेते मंडळींनी सावंतवाडीत धाव घेतली. राजमातांच्या पार्थिवाचे अखेरचे दर्शन घेतले. पाहूयात राजमातांच्या निधनाने कशी पोरकी झाली सावंतवाडी आणि कशी सुन्न झाली सावंतवाडी ….

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here