सदस्याचा श्रेयवाद , मानापमान आणि कृषी अधिकाऱ्याची दिलगिरी; देवगड पंचायत समिती सभा संपन्न

0
275
देवगड : पंचायत समितीची मासिक सभा मानापमानाच्या श्रेयवादात सोमवारी किसानभवन सभागृहात सभापती जयश्री आडीवरेकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. १ जुलैला बापर्डे येथे आयोजित केलेल्या कृषी दिनाचे निमंत्रण विरोधीगटाचे पं स सदस्य व पत्रकार यांना न दिल्याने सदस्य डॉ. अमोल तेली, अजित कांबळे, रवी पाळेकर आक्रमक झाल्याने अखेर कृषि अधिकारी शारदा नाडेकर यांनी सदस्य व पत्रकार यांची दिलगिरी व्यक्त करत वादावर पडदा पाडला. सभेच्या प्रारंभी पोलादपूर अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या कोकण कृषी विद्यापीठाच्या कर्मचाऱ्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली . देवगड पंचायत समितीच्यावतीने बापर्डे येथे आयोजित कृषिदिनात पं. स. सदस्य व पत्रकार यांना निमंत्रण न दिल्याने डॉ. अमोल तेली, रवी पाळेकर, अजित कांबळे  आक्रमक झाले. अखेर सहाय्यक गटविकास अधिकारी व कृषि अधिकारी शारदा नाडेकर यांनी अनावधानाने झालेल्या चुकीबाबत दिलगिरी व्यक्त करून वादावर पडदा पाडला. पं. स. कार्यालयात ग्रामीण पाणी पुरवठा कार्यालय स्थलांतर झाले याचे श्रेय आमदार नितेश राणे, जि प उपाध्यक्ष रणजीत देसाई, शिक्षण व आरोग्य सभापती प्रीतेश राउळ, व पं. स.सदस्य अजित कांबळे यांचा अभिनंदन ठराव डॉ. अमोल तेली, रवी पाळेकर यांनी मांडला त्याला सत्ताधारी गटाचे सदस्य ओगले यांनी हरकत घेतल्याने सभागृहात काहीवेळ श्रेयवादवरून शाब्दिक चकमक जुंपली. यासभेत पशुसंवर्धन विभागाच्या विविध योजनांची माहिती पशुधन अधिकारी विवेक ढेकणे यांनी दिली. यावेळी शिक्षण, जि. प. बांधकाम, सार्वजनिक बांधकाम , बीएसएनएल, एसटी, आरोग्य आदी विषयाचा आढावा घेण्यात आला. मंजूर झालेली कामे नियोजित वेळेत न करता अर्धवट ठेवणाऱ्या ठेकेदार यांचेवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी सदस्य सुनील पारकर यांनी केली तसेच या सभेदरम्यान आद्यपत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांना मरणोत्तर भारतरत्न  पुरस्कार देण्यात यावा अशी मागणी उपसभापती संजय देवरुखकर यांनी  केली याबाबतचा ठराव घेण्यात आला या सभेस गटविकास अधिकारी जयप्रकाश परब, सहाय्यक गटविकास अधिकारी शारदा नाडेकर, सर्व सदस्य खाते अधिकारी आदी उपस्थिती होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here