युवा साहित्य मंचातर्फे सावंतवाडीत ‘महाविद्यालयीन काव्यस्पर्धा’

0
303

सावंतवाडी : युवा साहित्य मंच, सिंधुदुर्ग ; श्रीराम वाचन मंदिर, सावंतवाडी आणि व्हिजन, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवार २२ ऑगस्ट २०१८ रोजी ‘‘राज्यस्तरीय महाविद्यालयीन काव्यस्पर्धा’’ सावंतवाडीमध्ये आयोजित करण्यात आली आहे.  ही स्पर्धा श्रीराम वाचन मंदिर, सावंतवाडीच्या सभागृहात घेण्यात येणार असून प्रसिध्द संगीतकार कौशल इनामदार या स्पर्धेसाठी प्रमुख अतिथी व मार्गदर्शक म्हणून उपस्थित राहणार आहेत. यापूर्वी युवा साहित्य मंचाने घेतलेल्या महाविद्यालयीन काव्यस्पर्धेमध्ये गोवा ते रायगड भागातील तरुण कवींनी प्रचंड संख्येने सहभाग घेतला होता. ही काव्यस्पर्धा महाविद्यालयीन गटाकरीता मर्यादित असेल. स्पर्धकाकडे महाविद्यालयाचे ओळखपत्र असणे आवश्यक आहे. स्पर्धक कवीने मराठी भाषेतील स्वरचित दोन निवडक कविता पाठवाव्यात. त्यांची छाननी करुन त्यापैकी एका कवितेची निवड स्पर्धेतील सादरीकरणासाठी करण्यात येईल. परीक्षकांचा निर्णय सर्व स्पर्धक कवींवर बंधनकारक असेल. सादरीकरणासाठी निवड झालेल्या स्पर्धक कवींना त्याबाबत कळवण्यात येईल.सर्वोत्कृष्ट कवितांसाठी प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाची अनुक्रमे रु. १०००, रु. ७०० व रु. ५०० आणि प्रत्येकी रु. २०० रुपयांची तीन उत्तेजनार्थ पारितोषिके व प्रमाणपत्रे देण्यात येतील. स्पर्धेसाठी प्रवेश शुल्क रु. ५० आहे. सर्व सहभागी स्पर्धक कवींना सहभाग प्रमाणपत्र देण्यात येईल. स्पर्धक कवींनी आपल्या दोन कविता लिफाफ्यामध्ये घालून त्यावर ‘युवा साहित्य मंच महाविद्यालयीन काव्यस्पर्धा २०१८’ असे लिहून एक पासपोर्ट आकाराचा फोटो आणि महाविद्यालयाच्या ओळखपत्राची झेरॉक्स व प्रवेश शुल्क यासह श्रीराम वाचन मंदिर, सावंतवाडी, जिल्हा सिंधुदुर्ग पिन ४१६ ५१० या पत्त्यावर पाठवावा. स्पर्धक कवी आपल्या कविता युनिकोड फॉण्टमध्ये किंवा पीडीएफ स्वरुपात  yuvasahityamanchsindhu@gmail.com या ई-मेलवरही पाठवू शकतात. अधिक माहितीसाठी राजेश मोंडकर ९४२३३०१७३१ (युवा साहित्य मंच) यांच्याशी संपर्क साधावा. या स्पर्धेमध्ये अधिकाधिक महाविद्यालयीन तरुण कवींनी सहभागी होण्याचे आवाहन श्रीराम वाचन मंदिरचे अध्यक्ष प्रा. प्रवीण बांदेकर, युवा साहित्य मंचाचे राजेश मोंडकर व प्रा. सुमेधा नाईक आणि व्हिजनचे श्रीनिवास नार्वेकर यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here