एस एस कम्युनिकेशनच्या मोबाईल स्टोअरचा मंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते होणार शुभारंभ

0
314
सावंतवाडी : एस एस कम्युनिकेशनच्या कोकणातील ७ व्या शाखेचा शुभारंभ रविवारी पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते होणार आहे. या शुभारंभ प्रसंगी ग्राहकांसाठी  मोबाईल खरेदी व मोबाइल अँसेसरीज वर भरखोस सूट दिली जाणार आहे. मोबाइल खरेदी विश्वातील एक अग्रगण्य नाव म्हणजे एस एस कम्युनिकेशन. संपूर्ण महाराष्ट्रात ४१ शाखेतून मोबाईल विक्री व दुरुस्ती सेवा देणाऱ्या या कंमुनिकेशनच्या ४२ व्या शाखेचा व कोकणातील ७ व्या शाखेचा शुभारंभ रविवारी सकाळी ११ वाजता पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते शुभारंभ होणार आहे. या शुभारंभप्रसंगी ग्राहकांसाठी मोबाईल खरेदी व मोबाइल अँसेसरीजवर भरखोस सूट दिली जाणार आहे. या ठिकाणी आंतरराष्ट्रीय १८ मोबाईल कंपन्यांचे मोबाइल विक्रीसाठी ठेवण्यात येणार असून शून्य टक्के व्याजदराने मोबाईल खरेदीची सेवा ही उपलब्ध केली जाणार आहे. या मोबाईल खरेदीसाठी आता सर्व मोबाईल सेवा एका छताखाली मिळणार असल्याने ग्राहकांनी या मोबाईल स्टोअर्सला भेट देऊन या सेवेचा लाभ घ्यावा असे आवाहन एस एस कम्युनिकेशनने केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here