रॅॅँकिंगमध्ये विराट कोहली नंबर वन !

0
331

लंडन : इंग्लंड विरुद्धची कसोटी खिशात घातल्यानंतर टीम इंडियाच रन मशीन अर्थात कर्णधार विराट कोहली पुन्हा एकदा अव्वलस्थानी विराजमान झाला आहे. पहिल्या डावात ९७ आणि दुसऱ्या डावात १०३ धावा ठोकणाऱ्या विराटने कसोटी  रॅॅँकिंगमध्ये पहिल्या स्थानी झेप घेतली. विराटने ऑस्ट्रेलियाचा हकालपट्टी झालेला कर्णधार स्टीव्ह स्मिथला मागे टाकल आहे. कोहलीने कामावलेले ९३७ इतके गुण हे आजपर्यंत कोणत्याही भारतीय फलंदाजाल मिळाले नव्हते. विराटने सध्या चालू असलेल्या इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत जबरदस्त फलंदाजी केली आहे. तीन कसोटी सामन्यात कोहलीने २ शतकांसह ४४० धावा ठोकल्या आहेत. अजून दोन कसोटी सामने शिल्लक आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here