कॅथाॅलिक अर्बन बँकचा ६ ऑक्टोंबर रोजी रौप्य महोत्सव ; संस्थेतर्फे क्रिडा स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन

0
373
सावंतवाडी : कॅथाॅलिक अर्बन को. ऑप. क्रेडीत सोसा.लि. सावंतवाडी या संस्थेला ६ ऑक्टोंबर रोजी २५ वर्षे पूर्ण होत आहेत. या रौप्य महोत्सवाचे औचित्य साधून संस्थेतर्फे विविध स्पर्धा व मनोरंजन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं आहे. यामध्ये जिल्हास्तरीय मॅरेथाॅन स्पर्धा, ‘कॅथाॅलिक श्री’ शरीर सौष्ठव स्पर्धा तसेच सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलं आहे. सर्व कार्यक्रमांमध्ये जास्तीत जास्त लोकांनी सहभाग घ्यावा असे आवाहन चेअरमन पि. एफ. डॉन्टस यांनी केल आहे.
रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण करत असताना संस्थेनं रविवारी ७ ऑक्टोंबर रोजी सकाळी ७ वाजता जिल्हास्तरीय मॅरेथाॅन स्पर्धा सावंतवाडी इथ आयोजित केलीय. मॅरेथाॅन स्पर्धा हि तीन गटांमध्ये होणार असून सदर स्पर्धेत सहभाग घेणाऱ्या खेळाडूंनी नावनोंदणी करणे आवश्यक आहे. नावनोंदणी संस्थेच्या कुठल्याही शाखेत करता येईल. नावनोंदणीची अंतिम तारीख  ६ ऑक्टोंबर दुपारी १२ वाजेपर्यंत राहिलं. याच दिवशी सायंकाळी ५ वा. सावंतवाडी इथ आर.पी.डी. च्या पटांगणावर, ‘कॅथाॅलिक श्री’ शरीर सौष्ठव स्पर्धा होणार आहे. या स्पर्धा पाच गटांमध्ये होणार आहे. विजेत्या स्पर्धकाला रोख रुपये,स्मुर्ती चिन्ह व प्रशस्तीपत्र अशी पारितोषिके देण्यात येणार आहे. तसेच वर्षभरात रांगोळी, ग्रुप डान्स, मिस कॅथाॅलिक ,कब्बडी,पाककला,चित्रकला अशा विविध स्पर्धांच आयोजन करण्यात येणार आहे.  रौप्य महोत्सवी संस्थेच्या ”कॅथाॅलिक सिल्व्हर डीपोझीट” या ठेव योजने अंतर्गत गुंतवणूक केलेल्या ठेवीदारांसाठी खास लकी ड्राॅ ठेवण्यात आलाय अशी माहिती चेअरमन पि. एफ. डॉन्टस यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिलीय. याप्रसंगी सेक्रेटरी मार्टिन झुजे आल्मेडा, जनरल मॅनेजर जेम्स झुजे आल्मेडा, असिस्टंट  जनरल मॅनेजर एवरीस्ट मेंडीस आदि उपस्थित होते.  

 

 

ताज्या बातम्यांसाठी आमच्या Whatsapp ग्रुपवर ऍड होण्यासाठी येथे क्लिक करा.