कळणे येथे कार कोसळली घाटात ; सुदैवाने जीवित हानी टळली

0
424
दोडामार्ग : कळणे येथील अवघड वळणावर दोडामार्गच्या दिशेने येताना केर भेकुर्ली येथील मुंबईतील चाकरमान्याच्या क्विड गाडीला दुचाकीने हूल दिल्याने अपघात झाला. या अपघातात कार थेट घाटात कोसळली खरी मात्र सुदैवाने या अपघातात कोणतीही हानी झाली नाही.गणेश चतुर्थीला मुंबई हून केर भेकुर्ली येथील चाकरमानी गावी येत असताना कळणे घाटीत अवघड वळणावर चार चाकी वाहानाला अपघात झाला. मंगळवारी दुपारी सदर अपघात झाला. मुंबईतील चाकरमानी आपली क्विड कार घेऊन दोडामार्गच्या दिशेने येत होते. परंतु येथील अवघड वळणावर समोरून येणाऱ्या गाडीचा अंदाज आला नाही. दुचाकी अचानकसमोर आल्याने प्रसंगावधान राखण्यासाठी त्यानी आपली चार चाकी गाडी रस्त्याच्या बाहेर घातली. परंतु रस्त्याच्या कडेला झाडी वाढलेली असल्याने घळणीचा अंदाज आला नाही. त्यामुळे गाडी थेट घळणीत गेली. या गाडीने पाच प्रवासी प्रवास करत होते. सुदैवाने एकाही प्रवाशाला दुखापत झाली नाही.

 

 

ताज्या बातम्यांसाठी आमच्या Whatsapp ग्रुपवर ऍड होण्यासाठी येथे क्लिक करा.