मांगवलीतील पांचाळ कुटुंब जोपोसतोय वडीलोपार्जीत कलेचा वारसा..

0
521
वैभववाडी : समाजात सध्या वडीलोपार्जीत संपत्तीवरुन वाद असल्याचे आपण सर्वच पाहतो. यासाठी कोर्ट कचे-यामध्ये अनेकजन गुंतलेले आपण पावलोपावली पाहतो. वडीलोपार्जीत संपत्तीवर सा-यांच डोळा असतो, मात्र त्यांच्या कर्तबगारीपासून वारस दुरावल्याच आपण अनुभवतो. परंतु काही जण बापजाद्यांच्या संपत्तीपेक्षा त्यांनी जोपासलेला वसा पुढे नेण्यात धन्यता मानतात. असच एक मांगवलीत पांचाळ कुटुंब आहे,वडीलोपर्जीत गणेश मुर्ती शाळेचा वारसा पुढे चालवित आहेत. त्यांच्या या कामगिरीचा आढावा घेतला आमचे वैभववाडीचे प्रतिनिधी श्रीधर साळुंखे यांनी …
समाजाची आजची रित ही वेगळी बनत आहे.समाज बदलत असताना जुन्या परंपरापासून लांब चालल्याच आपण पाहतो.वडीलोपार्जीत असलेला एखादा व्यवसाय पुढे चालविण्यात आताची पिढी सहसा तयार होताना दिसत नाही.कारण व्यवसायापेक्षा यांच मन रम ते नोकरीत.मात्र वैभववाडी तालुक्यातील मांगवली येथील पांचाळ कुटुंब याला अपवाद आहे.वडीलोपार्जीत असलेला गणेश मुर्ती शाळेचा व्यवसाय हे कुटुंब अगदी समर्थपणे चावलवित आहे.कुटुंब प्रमुख असलेले हनुमंत पांचाळ गेली ३० वर्षे यशस्वी हे काम चोखपणे चालवित आहेत.वडील नारायण पांचाळ यांनी ७० वर्षे हा व्यवसाय संभाळला.वडीलांकडूनच कलेच बाळकडू मिळालेले हनुमंत पांचाळ आता पंचक्रोशीत उत्कृष्ट मुर्तीकार म्हणून प्रसिध्द झालेत.सध्या त्यांच्या कडे २५० मुर्ती बनविल्या जातात.त्यामध्ये २०० प्लास्टर अॉफ पॅरिसच्या तर ५० मातीच्या आहेत.जुन महीन्यापासून त्यांच्या मुर्ती कामाला प्रारंभ होतो.विशेष म्हणजे पांचाळ कुटुंबातील सर्वच सदस्य कलाकार आहेत. हनुमंत यांची आई,पत्नी,दोन छोटी मुले या व्यवसायात महत्त्वाची भुमिका बजावत.त्यांची ७० वर्षाची आई आजही हातावर योग्य नियंत्रण ठेवून उत्कृष्ट रंगकाम करते. तिचे ते काम सा-यांंनाच थक्क करणार आहे. पुर्वीची मुर्ती बनविण्याची पद्धत व आताची पद्धत कशी आहे हे त्यांच्याच तोंडून ऐका. आई सोबतच त्याच्या साथीला असते ती त्यांची धर्मपत्नी ..तसेच  त्यांची दोन छोटी मुले व भाचा यांचा मोठा हातभार त्यांना लाभतो.१ फुटापासून ४ फुटापर्यंतच्या मुर्त्या यांच्याकडे उपलब्ध असतात.वैभववाडी तालुक्यासह राजापुरमधील काही गावातील व्यक्ती यांच्याकडून गणेश मुर्त्या घेऊन जातात.वडीलोपार्जीत कलेचा वारसा जपत असल्याचा या कुटुंबाला मोठा अभिमान आहे हे,पांचाळ कुटुंबाच्या तिसऱ्या पिढीच्या हातातील ब्रश पाहूनच कळते.

 

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.