रेडी आणि शिरोडा खाडीतील गणेश विसर्जन होणार सुलभ* *माजी खासदार निलेश राणेंच्या पाठपुराव्यानंतर विसर्जन स्थळी जेटी मंजूर

0
616

सिंधुदुर्ग : वेंगुर्ला तालुक्यातील रेडी हुडा आणि शिरोडा खाडीतील गणेश विसर्जन यंदा सुलभ होणार आहे. या संदर्भात महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे सरचिटणीस माजी खासदार निलेश राणे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केलेल्या पाठपुराव्यानंतर या दोन्ही ठिकाणी जेटी आणि सुशोभिकरणाची कामे प्रस्तावित करण्यात आल्याची माहिती साठी मंजुरी देण्यात आल्याची बंदर विकास राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी लेखी पत्राद्वारे श्री. राणे याना दिली आहे. रेडी जिल्हा परिषद मतदार संघातील विकास कामांबाबत स्थानिक लोकप्रतिनिधी आणि ग्रामस्थांनी माजी खासदार निलेश राणे यांचे लक्ष वेधले होते. त्यानुसार रेडी हुडा (तर) कहदी येथे गणेश विसर्जन ठिकाणी जेटी आणि सुशोभीकरण, प्रकाश योजना करणे तसेच शिरोडा खाडी येथे गणेश विसर्जन ठिकाणी जेटी व सुशोभीकरण, प्रकाशयोजना करणे ही दोन कामे मंजूर करण्याची मागणी निलेश राणे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे केली होती. या मागणीस अनुसरून बंदर विकास राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी निलेश राणे याना सादर केलेल्या पत्रात ही दोन्ही कामे मंजूर केल्याचे म्हटले आहे. रेडी येथील काम महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डामार्फत सन २०१८ – २०१९ च्या मंजूर कामातून करण्यात येत असून शिरोडा खाडीतर येथील काम जिल्हा नियोजन समिती सिंधुदुर्ग मार्फत प्रस्तावित असल्याचे राज्यमंत्री चव्हाण यांनी कळविले आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.