मुंबईत हिऱ्यामध्ये अवतरले बाप्पा

0
503
मुंबई :  देशातल्या हिरे बाजारातील दहापैकी आठ हिरे बनवणाऱ्या हिंदुस्थानी डायमंड इंडस्ट्रीत मोठया प्रमाणात कच्चे हिरे येतात. सुरतमध्ये कच्चा हिऱ्यांची खरेदी करणारे हिरे व्यापारी बंकिमभाई शाह यांच्याकडे असलेला एक कच्चा हिरा सध्या सगळ्यांचे लक्ष वेधून घेतोय. या हिऱ्याचे वैशिष्टय़ म्हणजे याचा आकार हुबेहूब गणरायासारखा आहे. या कच्चा हिऱ्याची उंची ७० मिमी तर रुंदी ३० मिमी आहे. नैसर्गिकरीत्या गणपतीच्या आकारात आढळलेला हा हिरा सध्या हिरेबाजारात सगळ्यांच्या कुतूहलाचा विषय ठरलाय. हा दैवी चमत्कारच असल्याची सगळीकडे चर्चा आहे.  या अनोख्या हिऱ्याची नोंद गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड, लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड, इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये व्हावी, यासाठी नोंदणी देखील करण्यात आली आहे, अशी माहिती हिरेतज्ज्ञ हार्दिक हुंडीया यांनी दिली.
ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.