देवस्थानाचे वाद मिटवण्याचा संदेश दिला गाव रहाटीच्या देखाव्यातून

0
513
देवगड : जिल्ह्यात सुरु असलेले देवस्थानाचे वाद सामोपचाराने मिटवून सर्व गावाने एकत्र येत गावातील उत्सव साजरे करावेत, असा संदेश देणारा देखावा साकारलाय देवगड – दहिबाव येथील विनोद मुणगेकर कुटुंबीयांनी. गणेश चतुर्थी सणात प्रत्येकाच्या घरी बाप्पा येणार असल्याने सर्व घराची आपलं घर शुभोभिकरणासाठी लगबग चालू असते. घरी श्री गणराय विराजमान होणार यासाठी ठिकठिकाणी आकर्षक मकरे बसविली जातात. पूर्वी सार्वजनिक मंडळेच फक्त मोठ मोठे देखावे साकारायची पण आता तर अगदी घरगुती गणपती ही छानशा देखाव्यात बसवला जातो. घरगुती गणपतीला देखावे साकारून आता गणेश भक्त या देखाव्यातून समाज प्रबोधनाचे संदेश देवू लागलेत. असाच एक गाव रहाटीचा देखावा साकारलाय तो देवगड तालुक्यातील दहिबाव येथील विनोद वंसत मुणगेकर कुटुंबीयांनी. सध्या जिल्ह्यातील बहुतेक गावात देवस्थानाचे वाद सुरु आहेत. जिल्ह्यात आजही अनेक गावे देवस्थानांच्या गाव रहाटी वर चालतात. परंतु हीच पारंपारिक गाव रहाटी मानपानाच्या वादात अडकून पडलीय. तर काही ठिकाणी  गाव रहाटीच बंद आहे. याच गाव रहाटीचा देखावा साकारून मानपानाचा वाद घालत न बसता संपूर्ण गावाने एकत्र येत देवस्थानातील उत्सव गुण्यागोविंदाने साजरे करावेत असा संदेश यातून मुणगेकर कुटुंबीयांनी दिलाय. 
ताज्या बातम्यांसाठी आमच्या Whatsapp ग्रुपवर ऍड होण्यासाठी येथे क्लिक करा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here