पिंगुळीतील अजय गावडे कुटुंबियांची ‘ओवसा’ भरण्याची शेकडो वर्षांची परंपरा

0
767

कुडाळ : कोकणात आजही गणेशोत्सव पारंपारिक आणि विविध प्रथा प्रमाणेच साजरा केला जातो. कुडाळ तालुक्यातील पिंगुळी येथील गावडे कुटुंबातील सर्व सुहासिनी एकत्र येत गौरी पुजानादिवशी गौरीचा ओवसा भरतात.कोकणात विविध सणांमध्ये विविध रूढी परंपरा पहायला मिळतात. गौरी – गणपतीचा हा सण प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने आणि परंपरेने साजरा केला जातो.  गणेशोत्सव काळात गौरी गणपतीचा  ओवसा भरण्याची प्रथा मोठ्या प्रमाणात कोकणात पहायला मिळते. नवीन लग्न झालेले जोडपे गौरी – गणपतीजवळ पूजन करतात आणी पहिल्या वर्षी ओवसा भरण्याची प्रथा सुरू होते. मग दरवर्षी तो भरावाच लागतो. कुडाळ तालुक्यातील पिंगुळी येथील अजय गावडे यांच्या घरात तब्बल दीडशे गावडे कुटुंब गणपतिपूजन करतात. मुंबईला कामानिमित्त असणारे सगळे कुटुंबियांतील लोक गणपतील दाखल होतात. या कुटुंबात ५० सुहासिनी आहेत. त्यामुळे गावडे कुटुंबात गौरीचा ओवसा भरण्याचा कार्यक्रम अगदी थाटात आणि परंपरे साजरा होतो.

ताज्या बातम्यांसाठी आमच्या Whatsapp ग्रुपवर ऍड होण्यासाठी येथे क्लिक करा.