रोटरीनं दिला आधार | देवगडात पार पडला जयपूर फूट कॅम्प

0
301

देवगड : 

रोटरी क्लब मँगो सिटी देवगड व रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिड टाऊन आणि लोक कल्याण मंडळ द्वारा जयपूर फूट बसवणेचा कॅम्प दि. १८ एप्रिल २०२२ रोजी सांस्कृतिक भवन जामसंडे येथे आयोजित केला होता, सर्व लाभार्थीना ( ज्यांचे कृत्रिम पायासाठी मोजमाप घेतले आहे) त्यांना ते बसविण्यात आले. देवगडमध्ये जयपूर फूट घेता यावा या संकल्पनेतूनच रोटरी क्लब ऑफ मॅंगोसीटीचा जन्म झाला. या कार्यक्रमाच्या ईव्हेंट चेअरमन मनस्वी घारे व कुडाळ क्लबच्या साथिने कोल्हापूर मिडटाऊनच्या उत्कर्षा पाटिल ,श्रीमती अग्रवाल , प्रकाश गायकवाड यांच्या उदार देणगीतून अनेक लाभार्थ्यानां आज जयपूर फूट मिळाले. तसेच काहींनां लेग प्रोस्थेसीस देण्यात आले.  यावेळचा लाभार्थ्यांनां काही गवसल्याचा आनंद आणि कुटुंबियांच्या चेहर्‍यावरचे समाधान बरेच काही देऊन गेले.यावेळी चीफ गेस्ट फर्स्ट लेडी प्रितम धोंड या उपस्थित होत्या, आपल्या अध्यक्षिय भाषणात बोलतांनां त्यांनी कोंकणीत सर्वांशी संवाद साधला. हा कार्यक्रम चालू असतांनां जामसंडे हायस्कूल येथे अस्मिता हा कार्यक्रम घेण्यात आला.यावेळी डॉ. सरीता बोरफळकर यांनी किशोरवयीन मुलींनां मार्गदर्शन केले.या कार्यक्रमाच्या ईव्हेंट चेअरमन अनुश्री पारकर उपस्थित होत्या. या कार्यक्रमाचे प्रायोजक प्रकाश गायकवाड तसेच रोटरी क्लब ऑफ कोल्हापुर मिडटाऊनचे मान्यवर पदाधिकरी देवगड क्लबचे प्रेसिडेंट हनिफ मेमन आणि सेक्रेटरी संजय धुरी प्रवीण पोकळे, दयानंद पाटील, सुनील पारकर, राजेंद्र भुजबळ, संजय बोडेकर, श्रीपाद पारकर,सौ. अनुश्री पारकर, अनिकेत बांदिवडेकर, गौरव पारकर, किरण पोकळे, महेश घारे व या कार्यक्रमाच्या ईव्हेंट चेअरमन सौ मनस्वी महेश घारे या उपस्थित होत्या.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.