कणकवली शहरात कमळ चषक स्पर्धा 23 एप्रिलपासून

0
189

कणकवली : 

कणकवली शहर भारतीय जनता पार्टी आयोजित आमदार नितेश राणे पुरस्कृत नागराध्यक्ष समीर नलावडे यांच्या सहकार्याने कमळ चषक टेनिस बॉल ओव्हरआर्म्स क्रिकेट स्पर्धा शनिवार दिनांक 23 एप्रिल व रविवार दिनांक 24 एप्रिल रोजी सकाळी 9 वाजल्यापासून विद्यामंदिर हायस्कूल च्या पाटांगणावर आयोजित करण्यात आली आहे.

ही स्पर्धा कणकवली शहरातील 17 प्रभाग मर्यादित असून आपल्या संघांची खेळाडूंसहित नावे दिनांक 21 एप्रिल पर्यंत (9420257722) (9860380738) या नंबर वर नाव नोंदवावीत. व सहकार्य करावे असे आव्हान भारतीय जनता पार्टीचे शहर अध्यक्ष अण्णा कोदे यांनी केले आहे.प्रथम क्रमांक रोख रक्कम 15023/- व कमळ चषक द्वितीय क्रमांक रोख रुपये 8023/- व कमळ चषक अष्टपैलू खेळाडू रोख रुपये 1023/- व कमळ चषक उत्कृष्ट फलंदाज रोख रुपये 723/- व कमळ चषक उत्कृष्ट गोलंदाज रोख रुपये 723/- व कमळ चषक. अशी बक्षिसे असणार आहेत

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.