मालवणातील बुद्धिबळ स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद

0
221

मालवण :

महाराट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती तालुका शाखा मालवण आयोजित श्री सुयोग मारूती धामापूरकर पुरस्कृत बुद्धिबळ स्पर्धा पार पडली. मुलांचा सर्वागिण विकास व्हावा या उद्देशाने राबविलेला उपक्रम कौतुकास्पद आहे असे प्रतिपादन मालवण पं. स. गटविकास अधि. जयेंद्र जाधव यांनी केले.

मालवण तालुका मर्यादित जि प प्राथमिक शाळेतील इयत्ता १ ली ते ५ वी , इयत्ता ६ वी ते ८ वी व प्राथमिक शिक्षकांसाठी अशा तीन गटात ही स्पर्धा घेण्यात आली. यात एकूण ६९ स्पर्धकांनी भाग घेतला. या उपक्रमाला जयेंद्र जाधव गटविकास अधिकारी पं. स मालवण गटशिक्षणाधिकारी मालवण संजय माने, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष नितिन कदम , मार्गदर्शक भाई चव्हाण, तालुकाध्यक्ष परमानंद वेंगुर्लेकर चंद्रसेन पाताडे, सचिव नवनाथ भोळे, जिल्हा उपाध्यक्ष चंद्रसेन पाताडे , प्रकाश झाडे, जिल्हा सदस्य राजन जोशी, तालुका शिक्षक नेते मंगेश कांबळी,तालुका कार्याध्यक्ष रुपेश गरुड , उपाध्यक्ष सुयोग धामापूरकर ,कोषाध्यक्ष तथा संचालक राजेंद्र प्रसाद गाड, तालुका महिला मंच अध्यक्षा नेहा तांबे , सचिव भाग्यश्री वाडकर, राष्ट्रीय पंच श्रीकृष्ण आडेलकर , सांखिकी वि. अ. श्री सावंत आदि उपस्थित होते १ ली ते ५वी गट प्रथम – कार्त्तिक अनिल पाताडे शाळा सुकळवाड ,द्वितीय यशश्री गुरुनाथ ताम्हणकर – मसुरे नं१, हेमंत शशिकांत तिळवे – तिरवडे, राजेश लिलाधर पाताडे – सुकळवाड, निधी प्रदिप वराडकर – वराड देऊळवाडा ६ वी ते ८ वी प्रथम अथर्व मंगेश गायकवाड – तिरवडे, द्वितीय अनिरुद्ध नरोत्तम गायकवाड – तिरवडे, आर्या उमेश गावडे -तिरवडे , घनश्याम वैभव पाताडे – सुकळवाड, चंद्रेश ललित पाताडे – सुकळवाड, शिक्षक वर्ग प्रथम भिमाशकर शेतसंधी – चिंदर कुंभारवाडी, द्वितीय सुयोग धामापूरकर – तिरवडे , तृतीय विनित देशपांडे – नांद रुख आमडोस, चतुर्थ पुनम हजारे – मठ बुद्रुक पाणलोस, पाचवा राजन जोशी – चिंदर बाजार कार्यक्रमाचे सुत्रसंचालन तालुका उपाध्यक्ष सुयोग थामापूरकर तर आभार तालुका सचिव नवनाथ भोळे यांनी मानले.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.