माणगाव खोऱ्यातील खेळाडू ऑलिंपिकमध्ये देशाचं प्रतिनिधित्व करताना दिसावेत : विशाल परब

0
108

कुडाळ :

माणगाव खोऱ्यात विविध प्रकारच्या क्रीडा स्पर्धा होतात. यात अनेक युवक आपले कौशल्य दाखवून स्वत:ची गुणवत्ता सिद्ध करत असतात. याच माणगाव खोऱ्यातील वाडोस सारख्या ग्रामीण भागात माझ जन्म झाला. माणगाव हायस्कूल मध्ये माझे शिक्षण झाले. याच माणगाव हायस्कूल च्या मैदानावर काॅलेज जीवनात खेळण्याची संधी मिळाली. माणगाव खोऱ्यातील होणारा सर्वच खेळांना मी नेहमीच प्रोत्साहन देत आलो आहे. या स्पर्धेत सहभाग घेणारा खेळाडूंनी मेहनत घेवून स्वताची गुणवत्ता सिद्ध करून दाखवावी आणि माणगाव खोऱ्यातून एक तरी खेळाडू ऑलिंपिक स्पर्धेत किंवा देश पातळीवर जावा.यासाठी लागणारे सर्व आर्थिक मदत व सहकार्य करायला आपण तयार आहे. असे भावनिक आवाहन माणगाव माळवाडी येथील कबड्डी स्पर्धेच्या उद्घाटन उद्घाटन प्रसंगी व्यासपीठावरून ते बोलत होते.

वेद प्रतिष्ठान आयोजित आणि भारतीय जनता पार्टी सिंधुदुर्ग जिल्हा पुरस्कृत सिंधुदुर्ग जिल्हा कबड्डी असोसिएशन च्या मान्यतेने केंद्रीय मंत्री नारायण राणेंच्या वाढदिवसानिमित्त भव्य दिव्य कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन भाजपचे युवा नेते आणी हिंद मराठा संघ सिंधुदुर्ग चे जिल्हाध्यक्ष विशाल परब यांच्या हस्ते झाले.

यावेळेस व्यासपीठावर अध्यक्षस्थानी विशाल परब,जिल्हा बँक संचालक प्रकाश मोर्ये, मोहन सावंत, रूपेश कानडे, दिनेश शिंदे, उपसरपंच दत्ता कोरगावकर, श्रावण धुरी, आनंद परब, आदम शेख, नेल्सन शिरोडकर आदी मान्यवर उपस्थित होते.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.