आमदार नितेश राणे यांचा दणक्यानंतर पगारापाठोपाठ लेव्हीची रक्कमही बेस्ट कामगारांच्या खात्यात जमा

0
516

मुंबई : बेस्ट कर्मचा-यांच्या रखडलेल्या पगाराबाबत व इतर प्रश्नांवर आमदार नितेश राणे यांनी १० सप्टेंबर रोजी महाव्यवस्थापक सुरेंद्र बागडे यांची भेट घेतली होती. आमदार नितेश राणे यांनी कामगारांचे रखडलेले पगार तातडीने करण्याची आणि लेव्हीची रक्कम त्वरित मिळण्याबाबत केलेली मागणी बागडे यांनी लगेचच मंजूर केली होती. त्यानुसार १२ सप्टेंबर रोजी झालेला पगार कर्मचा-यांच्या बँक खात्यात जमा झाला. आज २१ सप्टेंबर रोजी लेव्हीची रक्कमही कर्मचा-यांच्या बँक खात्यात जमा झाली. ऐन गणेशोत्सवादरम्यान आमदार नितेश राणे यांनी कर्मचा-यांना पगार आणि लेव्हीची रक्कम मिळवून देण्यासाठी केलेले प्रयत्न यशस्वी झाले आहेत. त्यामुळे आम्ही त्यांचे आभारी असल्याचे बेस्ट कामगारांचे नेते आणि समर्थ बेस्ट कामगार संघटनेचे सरचिटणीस संभाजी चव्हाण यांनी सांगितले.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.