समाजसेवा मंडळाचे अध्यक्ष पी.पी. देसाई यांचा दिव्यांग संघटनेनं केला सन्मान

0
194

दोडामार्ग :

माजी निवृत्त शिक्षक आणि अवघे आयुष्य सामाजिक सेवेसाठी वावरणारे कोलझर गावचे जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते व कोलझर समाजसेवा मंडळाचे अध्यक्ष सेवा निवृत्त आदर्श शिक्षक पी. पी देसाई यांचा नुकताच दोडामार्ग साईकृपा दिव्यांग, निराधार व गरजू संघटनेच्या वतीने दिव्यांग सहयोग पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. दोडामार्ग तालुक्यातील कोलझर या गावांत शेतकरी कुंटूंबात जन्म घेतलेल्या पी.पी. देसाई यांनी बालपणासूनच दुसऱ्याला वेळ प्रसंगी मदत करण्याची वृत्ती जोपासली.

शालेय शिक्षण पूर्ण करून शिक्षक म्हणून नोकरीला लागल्यावर त्यांनी अनेक विद्यार्थी घडविले इतकेच नव्हे तर गावच्या शैक्षणिक, सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रात त्यांचं अन्यनसाधरण योगदान राहिले आहे. इतकेच नव्हे तर देसाई सरांनी दिव्यांग निराधार संघटनेचे अध्यक्ष साबाजी सावंत यांनाही वेळोवेळी मार्गदर्शन व संघटनेला एक मार्गदर्शक म्हणून सहकार्य केले. त्यामुळे नुकत्याच झालेल्या संघटनेच्या सन्मान सोहळ्यात पी.पी. देसाई यांना सन्मानित करण्यात आले.
तहसीलदार अरुण खानोलकर यांच्याहस्ते हा सत्कार सन्मान झाला.

यावेळी पोलीस निरीक्षक आर. जी. नदाफ, गटविकास अधिकारी मिलिंद जाधव, शिक्षक भारतीचे राज्य उपाध्यक्ष दयानंद नाईक, डॉ. ज्ञानेश्वर एवळे, डॉ. गोविंद देसाई, सहाय्यक पोलीस निरीक्षक जयेश ठाकूर, साईकृपा दिव्यांग, निराधार, गरजू संघटनेने अध्यक्ष साबाजी सावंत, उपाध्यक्ष पांडुरंग राणे आदी मान्यवर उपस्थित होते.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.