बटलरनं मोडला ‘विराट’ विक्रम !

0
356

सावंतवाडी : आयपीएल 2022 मध्ये राजस्थान रॉयल्सचा सलामीवीर फलंदाज जोस बटलरने आपल्या उत्कृष्ट फलंदाजीने सगळ्यांची मने जिंकली आहेत. यादरम्यान जोस बटलरने भारताचा माजी कर्णधार विराट कोहली याचा एक रेकॉर्ड मोडीत काढला आहे. नुकत्याच काल पार पडलेल्या कोलकाता विरुद्धच्या सामन्यात त्याला आपल्या फलंदाजीने जास्त कमाल करता आली नाही. या सामन्यात त्याला फक्त केवळ 22 धावा करता आल्या. या सामन्यात राजस्थानचा 7 विकेट्सनी पराभव झाला, पण बटलरने आपल्या खेळीच्या जोरावर विराट कोहलीचा एक विक्रम मोडला आहे.

जोस बटलरने विराट कोहलीचा विक्रम मोडला जोस बटलरने कोलकाता विरुद्धच्या कालच्या सामन्यात 3 चौकारांच्या मदतीने 25 चेंडूत 22 धावा केल्या आणि या खेळीच्या जोरावर आयपीएल 2022 च्या पहिल्या 10 डावात 588 धावा केल्या. आयपीएलच्या एका मोसमातील पहिल्या दहा डावात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम आरसीबीचा माजी कर्णधार विराट कोहलीच्या नावावर होता. मात्र तो आता जोस बाटलरने मोडीत काढला आहे, विराट कोहलीने 2016 च्या मोसमात पहिल्या 10 डावात 568 धावा केल्या होत्या. तर बटलरने यंदाच्या मोसमात 10 डावात 588 धावा केल्या आहेत. त्यामुळे आता आयपीएलच्या एका मोसमातील पहिल्या 10 डावात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम जोस बटलरच्या नावावर झाला आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.