अकरा दिवसांच्या गणपतीचे अणाव मध्ये थाटात विसर्जन

0
424
गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या असा जयघोष करीत अनाव मध्ये अकरा दिवसांच्या गणपती बाप्पांना भावपूर्ण निरोप देण्यात आला.अनाव गावात गणेश मूर्तीचे वाजत गाजत ढोल ताशांच्या गजरात व फटाक्यांच्या आतषबाजीत सवाद्य मिरवणूक काढत नदीवर विसर्जन करण्यात आले यावर्षी गणेशोत्सवात पावसाने विश्रांती घेतल्याने भाविकांमध्ये उत्साह दिसून येत होता सायंकाळी उशिरापर्यंत हे विसर्जन सुरू होते विसर्जन स्थळी पूजन व आरती केल्यानंतर समस्त भक्त व ग्रामस्थांनी गणरायाला रक्षणासाठी साकडे घालण्यात आले संध्याकाळी सहा वाजल्यापासून गणेश विसर्जनात सुरुवात झाली रात्री उशिरापर्यंत हे विसर्जन सुरू होते गणेशोत्सवामुळे गेले अकरा दिवस गावागावांमध्ये उत्साही व भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते
ताज्या बातम्यांसाठी आमच्या Whatsapp ग्रुपवर ऍड होण्यासाठी येथे क्लिक करा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here