कणकवलीत अवैध दारूवर पोलिसांची रेड | तब्बल चौदा लाखाचा मुद्देमाल जप्त | तिघांना घेतले ताब्यात

0
149

कणकवली : सिंधुदुर्गनगरी एलसीबी पथकाने कणकवली बिजलीनगर येथे पहाटे 4 च्या सुमारास गोवा बनावटीच्या दारूवर रेड घातली. यामध्ये 3,72,000 किमतीची गोवा दारु, 10 लाखाची बलेनो कार, 35,000 तीन मोबाईल यासह तब्बल चौदा लाखाचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. यात तुषार विनायक तुळसकर (वय 24 वर्ष रा.सावंतवाडी), चेतक भरत वाळवे (वय 25 वर्ष रा.तिवरे कणकवली), महेश सुंदर आंबेरकर (वय 40 वर्ष रा. जानवली, कणकवली) या तिघांना ताब्यात घेतले आहे.

जिल्हा पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांच्या आदेशानुसार पोलीस निरीक्षक शंकर चिंदरकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक महेंद्र घाग यांच्या मार्गदर्शनाखाली रात्री गस्त घालत असताना ही कारवाई करण्यात आली. यावेळी सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक आर बी शेळके, पोलीस हवालदार कृष्णा केसरकर, पोलीस कॉन्स्टेबल रवी इंगळे, सिंधुदुर्गनगरी LCB सिंधुदुर्गनगरी पोलीस पथकाने ही कारवाई केली आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.