भवानी व्यानमातेच्या त्रैवार्षिक गोंधळानिमित्त ‘टॅलेंट बॉक्स’तर्फे गोंधळ गीताची निर्मिती

0
316

सावंतवाडी : सावंतभोसले कुटुंबाची कुलस्वामिनी देवी भवानी व्यानमातेच्या त्रैवार्षिक गोंधळानिमित्त टॅलेंट बॉक्स या युट्युब चॅनेलवर ‘भवानी व्यानमाता’ गोंधळ गीताची निर्मिती करण्यात आली आहे. वर्षा किशोर सावंतभोसले यांच्या संकल्पनेतून निर्माते श्री किशोर सावंतभोसले, श्री मुदस्सरनझर शिरगावकर, श्री बापू धुरी, श्रीउदय साटम यांच्या TALENT BOX कंपनीच्या माध्यमातून या गोंधळ गीताची अप्रतिम कलाकृती साकार झाली आहे.
कोकणामधील प्रसिद्ध भजन सम्राट बुवा गायक – विजय (गुंडू) सावंत भोसले आणि संदीप लोके या जोडीने उत्तम पद्धतीने गोंधळाचे पार्श्वगायन केले आहे. तर मेमरी कार्ड या चित्रपटाचे निर्माते व संगीतकार श्री मितेश चिंदरकर यांनी या गीताच्या दिग्दर्शनाची व संकलनाची जबाबदारी पार पाडली. गीताचे चित्रीकरण अंकित चिंदरकर यांनी केले आहे.
सावंतभोसले श्रीकुलस्वामिनी प्रतिष्ठान मुंबई अध्यक्ष विजय विनायक सावंतभोसले, सरचिटणीस कृष्णा वासुदेव सावंतभोसले, सल्लागार शशिकांत (आप्पा) नारायण सावंतभोसले व राजन सावंत भोसले, कुलस्वामिनी देवघरप्रमुख- कुणकेरी भवानीवाडा, यांनी आज सावंतवाडी येथे पत्रकार परिषदेत दिलेल्या माहितीनुसार या गोंधळ गीताची रचना राजेश बामुगडे ह्यांनी उत्तमरित्या केली आहे. मुंबईमधील संगीतकार अशोक वायंगणकर यांनी गोंधळ गीताला दमदारपणे संगीतबद्ध केले आहे. गीताचे ध्वनीमुद्रण आणि मिक्सिंग विधी व्हॉईस स्टुडिओ, मुंबई येथे श्रीकृष्ण सावंत यांनी केले आहे. TALENT Box या कंपनीला गीताची निर्मिती करण्यासाठी मनोज चौधरी यांनी मोलाची साथ दिली आहे.
दर्जेदार कलाकृती, निखळ मनोरंजन आणि दिमाखदार कंटेंटमुळे टॅलेंट बॉक्स या युट्युब चॅनेलने सोशल मीडियावर गरुडझेप घेतली आहे. नावाप्रमाणेच टॅलेंटचा खजिना असणारे टॅलेंट बॉक्स हे चॅनेल अत्यंत कमी कालावधीत लोकप्रिय झाले आहे. टॅलेंट बॉक्स कंपनीच्या माध्यमातून प्रेक्षकांसाठी युट्युबवर नवनवीन कलाकृतींची निर्मिती केली जाते. नेहमीप्रमाणे या गीताच्या बरोबरच आगामी काळात नवनवीन आणखी प्रोजेक्ट घेवून टीव्ही सीरिअल्स, शॉर्ट फिल्म करण्याचा प्रयत्न असून त्यासाठी नवोदित कलाकारांना संधी देवुन त्यांच्या कलागुणांना टॅलेंट बॉक्सच्या माध्यमाने लोकप्रियता देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत असल्याचे आश्वासन टॅलेंट बॉक्स कंपनीच्या निर्मात्यांनी दिले आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.