सावंतवाडी : भाजपचे उपप्रदेशांध्यक्ष, सिंधुदुर्ग-रत्नागिरीचे प्रभारी युवा नेते आ. प्रसाद लाड यांचं भाजप जिल्हा प्रवक्ते तथा सावंतवाडीचे माजी नगराध्यक्ष सच्चिदानंद उर्फ संजू परब यांनी सिंधुदुर्गात स्वागत केल. यावेळी आ. प्रसाद लाड आणि संजू परब यांच्यात आगामी नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चर्चा झाली.
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार पालिका निवडणुकांसाठी प्रभाग रचना कार्यक्रम जाहीर करण्यात आल्यानंतर हि चर्चा झाली. त्यातच भाजप प्रदेश सचिव तथा माजी खासदार निलेश राणे हे १६ मे रोजी सायंकाळी ४ वाजता कार्यकर्त्यांशी संवाद साधणार असून या पार्श्वभूमीवर आ. प्रसाद लाड यांच्याशी झालेली ही चर्चा महत्वपूर्ण मानली जात आहे. यावेळी त्यांच्यासोबत भाजप युवा मोर्चा सरचिटणीस बंटी पुरोहित, महेश धुरी आदि भाजप कार्यकर्ते उपस्थित होते.