तोपर्यंत राज ठाकरेंना अयोध्येत घुसू देणार नाही | भाजप खासदार बृजभूषण शरण सिंह यांचा इशारा

0
224

अयोध्या : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्यासाठी पक्षाकडून जय्यत तयारी सुरु असताना दुसरीकडे उत्तर प्रदेशात मात्र त्यांना रोखण्याची तयारी सुरु झाली आहे. उत्तर भारतीयांची जाहीरपणे माफी मागितल्यशिवाय त्यांना अयोध्येत घुसू देणार नाही, असा इशारा भाजपाचे खासदार बृजभूषण शरण सिंह यांनी आधीच दिला आहे. त्यातच आता त्यांनी नंदिनी येथे साधुसंत आणि नागरिकांसोबत बैठकीचं आयोजन केलं असून यावेळी काय निर्णय घेतला जातो याची उत्सुकता आहे.

राज्यात अचानक आक्रमक हिंदुत्वाचे राजकारण करू लागलेले राज ठाकरे यांनी ५ जून रोजी अयोध्येला जाऊन रामलल्लाचे दर्शन घेणार असल्याचे जाहीर केले आहे. पण त्यांच्या दौऱ्यापूर्वीच भाजपाचे कैसरगंजचे खासदार बृजभूषण सिंह यांनी स्वत:ला प्रसिद्धीच्या झोतात आणि स्वपक्षाला अडचणीत आणले आहे. महाराष्ट्रामध्ये भाजपाचे नेते राज ठाकरे यांची पाठराखण करत असले तरी उत्तर प्रदेशातील भाजपा खासदाराने मात्र राज यांना आव्हान दिले आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.