मुंबई :
मुंबई विद्यापीठ श्रीमान बाळासाहेब ठाकरे अध्यासन केंद्र, सार्थ प्रतिष्ठान व मुंबई न्यूज फोटोग्राफर असोसिएशन यांच्या वतीने छायाचित्र स्पर्धाचं आयोजन करण्यात आलं आहे. स्वातंत्र्योत्तर मुंबई: जडणघडण व विकास या विषयावरील ही फोटोग्राफी स्पर्धा आयोजित करण्यात आली असून कोणत्याही वयोगटातील व्यक्ती या स्पर्धेत सहभागी होवू शकते तसेच या स्पर्धेसाठी प्रवेश विनामूल्य असून एका स्पर्धकाने एकच प्रवेशिका दाखल करावयाची आहे.
१२ मे २०२२ पर्यंत आपले फोटोग्राफ्स photography@mu.ac.in या इमेलवर पाठवण्यात यावी स्पर्धेसाठी पाठवण्यात येणारं छायाचित्र हे स्पर्धेकाने स्वत: काढलेलं असावं तसेच स्पर्धेसाठी सादर केलेलं छायाचित्र हे यापूर्वी कुठल्याही माध्ममांमध्ये प्रकाशित झालेलं नसावं तर छायाचित्रामध्ये कोणत्याही प्रकारचं एडीटींग केलेलं नसावं. विजेत्या स्पर्धकांना रोख रक्कम, सन्मानचिन्ह व प्रशस्तिपत्रक देऊव गौरवण्यात येणार आहे .