रुपया नीचांकी पातळीवर…!

0
304

मुंबई : परदेशातील बाजारातील अमेरिकी चलनाची स्थिरता आणि परदेशी भांडवलाचा सतत होणारा ओघ यामुळे सोमवारी रुपया 60 पैशांनी घसरून 77.50 (तात्पुरता) या विक्रमी नीचांकी पातळीवर बंद झाला.

वाढत्या चलनवाढीच्या चिंतेमुळे आणि जागतिक मध्यवर्ती बँकांकडून दरात आणखी वाढ होण्याची भीती यामुळे गुंतवणूकदार जोखीम घेण्यास कचरत असल्याचे विदेशी मुद्रा व्यापार्‍यांनी सांगितले.

आंतरबँक परकीय चलन बाजारात, अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपया ७७.१७ वर घसरला आणि नंतर ७७.५० वर येऊन थांबला. मागील किंमतीच्या तुलनेत ही घसरण ६० पैशांची आहे.

दिवसाच्या व्यवहारादरम्यान रुपया ७७.५२ या सार्वकालिक नीचांकी पातळीवर आला. यापूर्वी, गेल्या आठवड्यात शुक्रवारी रुपया ५५ पैशांनी घसरून ७६.९० वर आला होता.

गेल्या काही दिवसांमध्ये अमेरिकन चलनाच्या तुलनेत रुपयाचे मूल्य ११५ पैशांनी घसरले आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.